आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSSच्या घरात प्रेमाच्या नावावर रंगल्या रासलीला, जाणून घ्या या लव्ह स्टोरीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस भारतातील मोठ्या रिअ‍ॅलिटी शोपैकी एक आहे. सध्या बिग बॉसच्या सातव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. हा शो बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करतोय. गेल्या चार पर्वांपासून सलमान खान याचा सुत्रधार आहे. मात्र या शोमधील वाद-विवादांबद्दल सांगायचे झाल्यास पहिल्या पर्वापासून हा शो आणि वाद हे जणू समीकरणच झाले आहे.

तसे पाहता एखाद्या घरात अनोळखी बारा तेरा जण एकत्र आल्यावर वाद होणं स्वाभाविकच आहे. मात्र रंजक गोष्ट म्हणजे या वादविवादांमध्ये अनेक लोकांचे आपापसांत एक नातंही निर्माण होतं. आम्ही बोलतोय ते बिग बॉसच्या घरात रंगणा-या लव्ह स्टोरीजबद्दल.

बिग बॉसचे कदाचितच एखादेच असे पर्व असावे, जिथे सेलिब्रिटींमध्ये रोमान्स रंगला नसेल. आता याच पर्वाला बघा. पहिल्याच आठवड्यात कुशल टंडन आणि गौहर खान यांच्यात रोमान्स सुरु झाला. या शोच्या आठव्या दिवशी घरातील दिवे मावळल्यानंतर सर्व स्पर्धक झोपी गेले असताना हे दोघे जवळीक साधून एकमेकांबरोबर गप्पा मारत होते.

असो, गौहर आणि कुशल या पर्वातील नवीन लव्ह बर्ड्स आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या शोच्या मागील पर्वात अश्मित पटेल आणि वीणा मलिक, सारा खान आणि आश्का गोराडिया यांचा लेस्बियन किस चांगलाच चर्चेत राहिला. इतकंच कशाला या शोमध्ये तर लग्नही बघायला मिळाले. मात्र या लग्नाचा शेवट काय झाला हे सर्वांनाच ठाऊक आहे.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बिग बॉसच्या पहिल्या पर्वापासून ते सातव्या पर्वापर्यंत रंगलेल्या लव्ह स्टोरीजबद्दल सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या बिग बॉसच्या घरात कोणकोण प्रेमात पडले होते...