आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: गौतमच्या बेपरवाईचे डिआंड्रा देईल असे उत्तर, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उपेन पटेलला किस करताना डिआंड्रा)
मुंबई: 'बिग बॉस'च्या 8व्या पर्वाला सुरुवात होऊन दोन आठवडे उलटून गेले आहेत. परंतु घरातील मित्रत्व आणि शत्रुत्व दिवसेंदिवस बदलत जात आहेत. शोच्या सुरुवातीला गौतम आणि डिआंड्रा एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसले. मात्र, अचानक डिआंड्रा गौतमपासून दूरावा वाढवताना दिसली.
रविवारी एपिसोडमध्येसुध्दा तुम्ही पाहिले असेल, की गौतमचे पारडे जड झाले आणि डिआंड्रा चेह-यावर फक्त हावभाव दाखवताना दिसली. बिग बॉसमध्ये खूप मोठी चुक केल्यासारखे ती वागू लागली होती. यापूर्वी गौतम आणि सोनाली डान्स करत होते तेव्हा डिआंड्राला मनातून हेवा वाटत होता. नंतर आर्य बब्बरलासुध्दा गौतम आणि सोनालीची मैत्री खटकत आहे.
गौतम सोनालीशी जवळीक वाढवत आहे आणि डिआंड्रालासुध्दा समजले, की त्याला आपल्यात काहीच रुची नाहीये. त्यामुळे याचे चोख उत्तर देण्यासाठी डिआंड्रा, उपेनशी जवळीक वाढवताना दिसत आहे. येत्या एपिसोडमध्ये डिआंड्रा आणि उपेनला किस करताना दिसणार आहे. उपेनकडे पाहून असे वाटते, की विना गर्लफ्रेंड त्याला करमत नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डिआंड्राशी रोमान्स करत असताना गौतमने सोनालीशी कशी वाढवली जवळीक...