आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लीम तरुणीला डेट करतोय धर्मेश सर, हिंदु कुटुंबीयांचा आहे लग्नाला विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्लफ्रेंड ब्रेशना खानसह धर्मेश सर. - Divya Marathi
गर्लफ्रेंड ब्रेशना खानसह धर्मेश सर.
मुंबई - टिव्ही डान्स शोमधून घराघरांत पोहोचलेला धर्मेश म्हणजेच धर्मेश सर सध्या त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार धर्मेश सर सध्या ब्रेशना खानला डेट करत आहे. गेल्या 5 वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर त्यांनी अनेकदा तसे जाहिरही केले आहे.

कुटुंबाचा लग्नाला विरोध
5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर धर्मेश ब्रेशना यांना लग्न करायचे आहे. पण दोघांचे धर्म वेगळे आहेत. धर्मेश हिंदू तर ब्रेशना मुस्लीम आहे. त्यामुळे धर्मेशचे कुटुंबीय या नात्याला मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे अनेक दिवसांपासून हा मुद्दा अडकला आहे. पण लवकरच दोघे कुटुंबीयांना राजी करून विवाह करतील अशी अपेक्षा आहे.

धर्मेशचे करिअर..
31 ऑक्टोबर 1983 ला जन्मलेला धर्मेश येलांडे डान्सर, कोरियोग्राफर आणि अॅक्टर आहे. क्रेझी किया रे (2007), बुगी-वुगी (2008), डांस इंडिया डांस सीजन 2 (2009-10), डीआयडी डबल्स (2010-11), जस्ट डांस (2011) सारख्या शोमध्ये त्याने सहभाग घेतलेला आहे. 'डान्स प्लस' आणि 'डान्स प्लस सीजन 2' मध्ये तो कोचच्या भूमिकेत आहे. त्याशिवाय त्याने 'ABCD', 'ABCD2' मध्ये भूमिका केली आहे. तसेच रितेश बरोबरचा त्याचा बँजो चित्रपटही लवकरच रिलीज होतोय.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेले धर्मेश आणि ब्रेशना खानचे PHOTOS..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...