आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love Story: ऑनस्क्रीन वहिनीसोबत थाटला राम कपूरने संसार, रामचे पहिले-गौतमीचे दुसरे लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'बडे अच्छे लगते हैं' या प्रसिद्ध मालिकेसोबतच अनेक सिनेमांमध्ये झळकलेले अभिनेते राम कपूर 42 वर्षांचे झाले आहेत. 1 सप्टेंबर 1973 रोजी नवी दिल्लीत त्यांचा जन्म झाला. राम यांच्या रील लाइफविषयी सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र त्यांच्या खासगी आयुष्याविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही. उदाहरणार्थ राम कपूर यांनी त्यांच्या ऑनस्क्रिन वहिनींसोबत लग्न केले आहे.

'घर एक मंदीर' या मालिकेत गौतमीचे दीर बनले होते राम कपूर...
राम कपूर आणि गौतमी गाडगीळ यांच्या लव्ह स्टोरीला 'घर एक मंदिर' या मालिकेच्या सेटवर सुरुवात झाली होती. त्यावेळी गौतमीचे मॉडेलिंग करिअर यशोशिखरावर होते, तर रामसुद्धा टीव्ही मालिकांच्या माध्यमातून स्वतःचे करिअर सावरत होता. या मालिकेत गौतमीने रामच्या वहिनीची भूमिका वठवली होती. सेटवर होणा-या भेटीचे रुपांतर सुरुवातीला मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले.

उशीरा रात्रीपर्यंत पार्टी करणे गौतमीला नव्हते पसंत...
सुरुवातीच्या काळात राम उशीरा रात्रीपर्यंत पार्टीत बिझी असायचा. त्याची ही गोष्ट गौतमीला मुळीच आवडत नव्हती. हळूहळू रामने स्वतःमध्ये बदल घडवून आणला आणि नंतर तिच्याकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली. मात्र दोघांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या लग्नाला विरोध होता. राम पंजीबा कुटुंबातून तर गौतमी महाराष्ट्रीय कुटुंबातील आहे.

गौतमीचे दुसरे लग्न...
गौतमीचे हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न कमर्शिअल फोटोग्राफर मधुर श्रॉफसोबत झाले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसांतच हे दोघे विभक्त झाले.
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी राम-गौतमीने केले लग्न..
राम आणि गौतमीच्या कुटुंबीयांमध्ये यावरुन बरेच मतभेद होते. मात्र कालांतराने त्यांच्यातील मतभेद मिटले. राम आणि गौतमी यांनी आर्य समाजात लग्न केले होते. या दोघांनी दोन खोल्या असलेल्या घरातून आपल्या संसाराला सुरुवात केली होती. लग्नासाठी या दोघांनी 14 फेब्रुवारी अर्थातच व्हॅलेंटाइन डेची निवड केली होती.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, राम आणि गौतमीची खास छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...