आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'झलक दिखला जा'मध्ये दिसणार लुलियाची झलक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डान्स रिअलिटी शो 'झलक दिखला जा'च्या आगामी पर्वासाठी सेलिब्रिटींसोबत बातचीत केली जात आहे. या बातचीतमध्ये रोमनियन टीव्ही स्टार्स आणि सलमान खानची खास मैत्रीण लुलिया वेंचरसोबतसुध्दा बातचीत चालू आहे.
जर तिचा होकार आणि सर्वकाही ठिक राहिल्यास यावेळी लुलियाचे ठुमके सर्वांना झलक दिखला जाच्या स्टेजवर बघायला मिळतील.
एका सुत्राच्या सांगण्यानुसार, प्रॉडक्शन हाऊस आणि लुलिया यांच्यामध्ये बातचीत सुरू झाली आहे. तिच्या मते, 'लुलियाला या शोमध्ये सहभाग घेण्याची इच्छा आहे. चॅनलसाठीसुध्दा ती एक चांगली स्पर्धक राहिल. कारण शोच्या प्रत्येक पर्वात एक इंटरनॅशनल स्टारला संधी दिली जाते. याव्यतिरिक्त सलमान खानसोबतच्या अफेअरच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यापासून लोकांनाही ती परिचित झाली आहे.'
लुलियाने अलीकडेच सलमानच्या 'ओ तेरी' या प्रॉडक्शन सिनेमामध्ये आयटन साँग करून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. त्या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. चर्चा अशीही होती, की या शोमध्ये सहभाग घेण्याचा सल्ला सलमाननेच तिला दिला होता. त्याला वाटते, की या शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्स कौशल्याची ओळख प्रेक्षकांना करून द्यायला हवी.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, 'लुलिया प्रशिक्षित डान्सर नाहीये. परंतु ती डान्स कौशल्य घेणा-यांपैकी आहे. तसेच तिला डान्स करण्याचीसुध्दा आवड आहे. तिने जर या शोमध्ये सहभाग घेतला तर ती एक मजबूत स्पर्धाकाच्या रुपात सर्वांना टक्कर देऊ शकते.' लुलिया व्यतिरिक्त ज्या सेलिब्रिटींचे नाव शोसाठी निश्चित करण्यात आले त्यामध्ये शक्ती मोहन, अक्षत सिंह, पूरब कोहली, किकू शारदा, मौनी रॉय, पूजा बोस, क्रिकेटर श्रीसंत, सुखविंदर सिंह, सोफी चौधरी, अँडी, आशिष शर्मा, करण टाकर आणि क्रितिका कामरा हे स्टार्स सामील आहे.