मुंबईः 'झलक दिखला जा'च्या सातव्या पर्वाचा ग्रॅण्ड फिनाले शनिवारी छोट्या पडद्यावर रंगणार आहे. यावेळी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांची झक्कास कॉमेडी आणि रोमान्स प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अनिलने अलीकडेच 'झलक दिखला जा'च्या ग्रॅण्ड फिनालेचा एपिसोड शूट केला.
'झलक...'च्या सेटवर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी राम लखनमधील 'एक दो तीन' आणि 'बडा दुख दीन्हा वो राम जी' या गाण्यावर ताल धरला. त्यांचा हा परफॉर्मन्स उपस्थितांचे डोळे दिपवणारा ठरला.
अनिल आणि माधुरीच्या परफॉर्मन्ससोबतच या ग्रॅण्ड फिनालेत कॉमेडियन भारती रेमो डिसुजा आणि करण जोहरसोबत रोमान्स करताना दिसले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला शनिवारी छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या 'झलक...'च्या ग्रॅण्ड फिनालेची खास झलक दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अनिल-माधुरीच्या रोमान्ससह बरेच काही...