आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माधुरी दीक्षितचे बबली, तर करणचे गुट्ट पुट्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहानपणी प्रत्येकाचे प्रेमाने घेतले जाणारे एक नाव जरूर ठेवले असते. मग याला बॉलिवूडमधील सिनेतारेदेखील अपवाद कसे असतील. प्रेक्षकांनादेखील सिनेतार्‍यांचे लहानपणीचे नाव जाणून घेण्याची इच्छा असते. 'झलक दिखला जा 7'च्या मंचावर अशाच काही अँक्टरची लहानपणीची नावे उघड झाली.
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मधील दादी फेम अली असगर या शोमध्ये मनोरंजन करण्यासाठी सहभागी झाला होता. त्या वेळी त्याने खोडकर पद्धतीने, इथे कोणती बंगाली टीव्ही अभिनेत्री उपस्थित आहे आणि लहानपणीचे तिचे नाव काय? असा प्रश्न केला. त्या वेळी मौनी रॉयने आपल्याला लहानपणी 'मैनिया' नावाने हाक मारली जात असल्याचे सांगितले.
मौनीच्या या उत्तरानंतर शोची परीक्षक असलेल्या माधुरी दीक्षितने मला लहानपणी 'बबली' म्हटले जात होते, असे सांगितले. दुसरा परीक्षक असलेल्या करण जोहरने माझे लहानपणीचे नाव 'गुट्ट पुट्ट' असल्याचे सांगितले. या दोघांच्या लहानपणीच्या नावाचा उलगडा झाल्यानंतर तिसरा परीक्षक असलेल्या रेमो डिसुझानेदेखील माझ्या काळ्या रंगामुळे मला लहानपणी 'काळू' म्हटले जात असल्याचे सांगितले.