आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhuri Dixit Inspired Me To Become An Actor: Mahira Khan

या पाकिस्तानी अभिनेत्रीची प्रेरणा माधुरी दीक्षित, जाणून घ्या कोण आहे ही तरुणी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान)

मी अभिनेत्री बनण्यामागची माझी प्रेरणा माधुरी दीक्षित आहे, असे म्हणतेय माहिरा खान. माहिरा खान ही मुळची पाकिस्तानी अभिनेत्री आहे. सुंदर असण्यासोबतच ती एक उत्तम अभिनेत्रीसुद्धा आहे. तिचा पुरस्कारप्राप्त अभिनय असलेली खिराद ही व्यक्तिरेखा असलेली 'हमसफर' ही मालिका लवकरच जिंदगी वाहिनीवर सुरु होणार आहे. बॉलिवूड सिनेमे बघतच माहिरा लहानाची मोठी झाली आणि पडद्यावर माधुरी दीक्षितला पाहून तिने स्वतःसुद्धा अभिनेत्री व्हायचे ठरवले.
"मी केवळ माधुरी दीक्षितमुळे अभिनेत्री बनले. 'राम लखन'मधील 'बडा दुख दिया ओ रामजी' हे गाणे पाहताक्षणी मी माझ्या आईला सांगितले होते, मला हे करायचे आहे. मला टीव्हीवर जायचे आहे. मी नेहमीच तिच्या गाण्यांवर डान्स करत असे." असे माहिरा म्हणाली.
माधुरीचे मॅजिक अनुभवेपर्यंत माहिराच्या मनात अभिनेत्री व्हायचा विचारही आला नव्हता. भारतीय सुंदरी माधुरीने आपले लाखमोलाचे हास्य आणि सुंदर डान्स मुव्हससह अनेकांची मने जिंकली आहेत. माहिरासुद्धा तिची मोठी चाहती आहे.
माहिराने भविष्यात दिग्दर्शक इम्तियाज अली आणि विशाल भारद्वाज यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'हमसफर'मध्ये मुख्य भूमिका साकारणा-या माहिरा खानची ग्लॅमरस छायाचित्रे...