आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 63व्या वर्षी 'महाभारत' मालिकेतील अभिनेते धर्मेश तिवारी यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : धर्मेश तिवारी)
मुंबई - 'महाभारत' या गाजलेल्या टीव्ही मालिकेतील अभिनेते धर्मेश तिवारी यांचे बुधवारी निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. डायबिटीजमुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जाते. धर्मेश यांनी 1988 मध्ये टीव्हीवर प्रसारित होणा-या 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत पांडव आणि कौरव यांचे कुलगुरु कृपाचार्य यांची भूमिका साकारली होती.
सध्या ते CINTAA (Cine & TV Artist Association)चे जनरल सेक्रेटरी आणि FWICE (Federation of Western India Cine Employees)चे अध्यक्षपद भूषवत होते.
धर्मेश यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते रजा मुराद यांनी त्यांच्या निधनाची बातमी देताना सांगितले, "बुधवारी सकाळी चंदीगडमध्ये धर्मेश यांनी अखेरचा श्वास घेतला. हाय डायबिटीजमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. डायबिटीज असूनदेखील ते खूप सक्रिय होते. त्यांचे जाण्याने अभिनय जगताचे मोठे नुकसान झाले आहे."
CINTAAचे उपाध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी सांगितले, की अत्यवस्थ वाटत असल्यामुळे धर्मेश यांना रुग्णालयात दाखल करणअयात आले होते. उपाचारदरम्यान त्यांचे निधन झाले. धर्मेश यांच्या निधनाचे वृत्त पसरताच टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, कुणी काय म्हटले... (ट्विट्सचे प्रिंट शॉट)