आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 वर्षांनंतर आता असे दिसतात 'महाभारत'मधील कृष्ण, द्रौपदी आणि इतर स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 1988 ते 1990 याकाळात छोट्या पडद्यावर प्रसारित झालेल्या 'महाभारत' या मालिकेत कृष्णाच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेले अभिनेते नितीश भारद्वाज दीर्घ काळानंतर आगामी 'मोहनजो दाडो' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. शेवटचे ते 'अजब गजब घर जमाई' (2014) या मालिकेत दिसले होते. महाभारतातील भूमिकेतून ते एवढे प्रसिद्ध झाले होते, की घराघरांत त्यांना कृष्ण म्हणूनच ओळखले जाऊ लागले होते.
जनावरांचे डॉक्टर होते नितीश...
अभिनेते नितीश भारद्वाज यांनी महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका वठवली होती. 2 जून 1963 मध्ये जन्मलेल्या नितीश यांनी साकारलेली श्रीकृष्णाची भूमिका पडद्यावर अगदी जिवंत केली. लोक त्यांना देव समजू लागले होते. मालिकेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेनंतर त्यांनी 1996 मध्ये जमशेदपूर लोकसभा निवडणूक लढवली होती. विजयी होऊन ते खासदार बनले होते. नितीश यांनी अनेक मराठी सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. काही दिवसांपूर्वी ते मराठी डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसले होते. विशेष म्हणजे नितीश यांनी मुंबईतील व्हेटनरी कॉलेजमधून वैद्यकिय शिक्षणघेतले होते. मात्र डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी अभिनयाकडे आपले मन वळवले होते.

आता काय करतेय महाभारतातील इतर स्टार्स...
खरे नावः रुपा गांगुली
भूमिकेचे नावः द्रौपदी

25 नोव्हेंबर 1966 मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या रुपा गांगुली यांनी महाभारतमध्ये द्रौपदी हे पात्र साकारले होते. या मालिकेमुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. या मालिकेनंतर त्यांनी काही सिनेमांमध्येही काम केले. मात्र मालिकेमुळे मिळाले यश त्यांना पुन्हा मिळू शकले नाही. 1992 मध्ये रुपा यांन ध्रबू मुखर्जीसोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांनी मुलगा आकाशला जन्म दिला. लग्नाच्या 14 वर्षांनी म्हणजे 2007 मध्ये त्यांनी आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला. सध्या रुपा राजकारणात सक्रिय आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, महाभारतातील प्रसिद्ध कलाकारांच्या चेह-यात झालेला बदल आणि आता ते काय करतात..

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...