आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27 वर्षांनंतर आता असे दिसतात \'महाभारत\'मधील कृष्ण, द्रौपदी आणि इतर स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 1988 ते 1990 याकाळात टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या 'महाभारत' या मालिकेने लोकप्रियतेचे यशोशिखर गाठले होते. या मालिकेचे निर्माते बलदेव राज चोप्रा (बी. आर. चोप्रा) यांची 5 नोव्हेंबर रोजी नववी पुण्यतिथी होती. सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी दिलेल्या अमुल्य योगदानासाठी त्यांना 1995 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 5 नोव्हेंबर 2008 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. 
 
भारतीय सिनेसृष्टीत बी. आर. चोप्रा यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक आणि कौटुंबिक मुद्यांवर आधारित अगदी स्वच्छ सिनेमे बनवले. 22 एप्रिल 1914 रोजी लुधियानामध्ये जन्मलेले बी. आर. चोप्रा यांनी एक ओर नया दौर, वक्त, हमराज, कानून, गुमराह, इंसाफ का तराजू, निकाह, बाबुल आणि बागवान हे अविस्मरणीय सिनेमे बनवले. तर दुसरीकडे  'महाभारत' या मेगा मालिकेसाठी त्यांना ओळखले जाते. ही मालिका दूरदर्शनच्या इतिहासातील सर्वात यशस्वी मालिका ठरली. बी. आर. चोप्रा यांचे पूत्र रवी चोप्रा यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते.  

ही मालिका ऑफ एअर होऊन आता 27 वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र आजही मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या 25 वर्षांत मालिकेतील स्टारकास्टच्या लूकमध्ये बराच बदल झालेला दिसून येतो.  Divyamarathi.com तुम्हाला महाभारतातील प्रसिद्ध कलाकारांच्या चेह-यात झालेला बदल छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहे. 

अभिनेत्री रुपा गांगुली
पात्रः द्रौपदी 

25 नोव्हेंबर 1966 मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या रुपा गांगुली यांनी महाभारतमध्ये द्रौपदी हे पात्र साकारले होते. या मालिकेमुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. या मालिकेनंतर त्यांनी काही सिनेमांमध्येही काम केले. मात्र मालिकेमुळे मिळाले यश त्यांना पुन्हा मिळू शकले नाही. 1992 मध्ये रुपा यांन ध्रबू मुखर्जीसोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांनी मुलगा आकाशला जन्म दिला. लग्नाच्या 14 वर्षांनी म्हणजे 2007 मध्ये त्यांनी आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला. सध्या रुपा राजकारणात सक्रिय आहेत.
 
खरे नावः नितीश भारद्वाज
पात्राचे नावः भगवान श्रीकृष्ण
अभिनेते नितीश भारद्वाज यांनी महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका वठवली होती. 2 जून 1963 मध्ये जन्मलेल्या नितीश यांनी साकारलेली श्रीकृष्णाची भूमिका पडद्यावर अगदी जिवंत केली. लोक त्यांना देव समजू लागले होते. मालिकेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेनंतर त्यांनी 1996 मध्ये जमशेदपूर लोकसभा निवडणूक लढवली होती. विजयी होऊन ते खासदार बनले होते. नितीश यांनी अनेक मराठी सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. काही दिवसांपूर्वी ते मराठी डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसले होते. याशिवाय हृतिक रोशन स्टारर 'मोहनजोदाडो' या चित्रपटातसुद्धा ते महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. विशेष म्हणजे नितीश यांनी मुंबईतील व्हेटनरी कॉलेजमधून वैद्यकिय शिक्षण घेतले होते. मात्र डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी अभिनयाकडे आपले मन वळवले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, महाभारतातील प्रसिद्ध कलाकारांच्या चेह-यात झालेला बदल आणि आता ते काय करतात..
बातम्या आणखी आहेत...