आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Mahadev\' Celebrated Two Years Of Their Show Along With The Launch Of New TV Show Hatim

\'महादेव\'ने पूर्ण केले दोन वर्ष, \'हातिम\'च्या लाँन्चिंग निमित्त केली पार्टी, बघा काही खास छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाइफ ओके चॅनलवर प्रसारित होणारी मालिका 'देवो के देव महादेव'ची पूर्ण टीम एका पार्टीत दिसली. ही पार्टी नवीन मालिका 'हातिम'च्या लाँन्चिंग आणि त्याचबरोबर 'देवो के देव महादेव' मालिकेला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठेवण्यात आली होती. ट्राइंगल फिल्म कंपनीचा निर्माता निखिल सिन्हा आणि सुहाना सिन्हाने 'देवो के देव महादेव' आणि 'हातिम'च्या प्रचारासाठी या भव्य पार्टीचे आयोजन केलं होतं.
निखिल सिन्हाने त्याचा आनंद व्यक्त करताना सांगितलं, की 'खूप छान वाटतयं की 'देवो के देव महादेव'ने दोन वर्ष पूर्ण केले आहेत आणि नवीन वर्षाच्या सुरूवातीला 'हातिम' हा शो प्रसारित होणार आहे.'
राजबीर सिंह लवकरच हातिमच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने त्याच्या शरीरयष्टीने सर्वांना चकित केलं आहे. खूप कालावधीनंतर त्याची सर्वांनी प्रंशसा केली आहे.
पार्टीमध्ये रुबीना दिलनाइक म्हणजे सीता, महादेवाच्या रुपात ओळखला जाणारा मोहित रैना आणि सरस्वतीचन्द्र मालिकेतील गौतम रोडेसोबतच अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
पार्टीमध्ये मोहित रैना महादेवाच्या भूमिकेबाहेरील एका वेगळ्या लुकमध्ये दिसत होता. तो मखमली निळ्या रंगाच्या ब्लेजरमध्ये अधिक आकर्षक दिसत होता. रूबीना दिलनाइकने शॉर्ट काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला होता आणि सौंदर्यामध्ये भर म्हणून तिने आकर्षक हेअर स्टाइल केली होती. 'रोडीज'ची फेम पूजा बॅनर्जीसुध्दा गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. सोबतच 'महाभारत'ची सत्यवती म्हणजेच सायनतनी घोष पांढ-याशुभ्र रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा पार्टीचे काही खास छायाचित्रे...