आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

29 ऑगस्टनंतर बदलणार \'महाराणा प्रताप\', पाहा शोमधील फैजलची अविस्मरणीय छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('महाराणा प्रताप'ची सज्जाबाई अर्थातच दिव्यलक्ष्मीसह फैजल खान)
मुंबई: सोनी चॅनलची लोकप्रिय मालिका 'धरती का वीर पुत्र: महाराणा प्रताप'ची कहानी काही वर्षे पुढे जात आहे. 29 ऑगस्ट रोजी या शोच्या महाराणा प्रताप या पात्राची फैजल खान अखेरचे शूटिंग करणार आहे. त्यानंतर शोची कहानी काही वर्षे पुढे जात असल्याने महाराणा प्रतापच्या तारुण्यातील पात्राला चित्रीत करण्यात येणार आहे. याविषयी Divyamarathi.comने फैजलशी बातचीत केली.
फैजलने सांगितले, 'हा शो माझा आणि नेहमी माझाच राहणार आहे. अनेक दिवसांपासून अंदाज व्यक्त केले जात होते, की शोची कहानी काही वर्षे पुढे जाणार आहे. अखेर तो दिवस आला. 29 ऑगस्ट रोजी मी या शोसाठी अखेरचे शूटिंग करेल.'
'डान्स इंडिया डान्स'चा खिताब जिंकल्यानंतर फैजलने 'महाराणा प्रताप'मधून अभिनयामध्ये एंट्री केली. तो म्हणतो, 'या शोने माझे करिअर घडले आहे. मी शोला अलविदा म्हणणे माझ्यासाठी खूप कठिण आहे. शोमध्ये माझा अनुभव खूप चांगला होता. प्रेक्षक मला माझ्या पुढील आयुष्यासाठी आणि करिअरसाठी शुभेच्छा देतील.'
पुढे काय करण्याचा विचार आहे असे विचारल्यानंतर फैजल म्हणतो, 'सध्या मी फक्त महाराणा प्रतापवर लक्ष केंद्रीत करत आहे. परंतु भविष्यात मला आणखी प्रसिध्द होण्याची इच्छा आहे.' फैजलऐवजी आता शरद मल्होत्रा महाराणा प्रतापची भूमिका साकारताना दिसणार आहे.
शरदने सांगितले, 'मी महाराणा प्रतापची मुख्य भूमिका साकारणार आहे. याविषयी मी जास्त काही सांगू शकत नाही.' शरदला 2009मध्ये प्रसारित झालेल्या झीटीव्हीचा शो 'बनू मै तेरी दुल्हन'मध्ये त्याने काम केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शो आणि सेटशी संबंधित फैजल खानची काही अविस्मरणीय छायाचित्रे...