आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भट्ट बंधू घेऊन येणार तीन नवीन टीव्ही शो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - महेश भट्ट आणि मुकेश भट्ट)

स्टार चॅनलसोबत झालेल्या व्यवहाराअंतर्गत महेश आणि मुकेश भट्ट टीव्हीसाठी तीन फिक्शन शो बनवत आहेत. याचे शूटिंग मोठया उत्साहात चालू झाले आहे. मुंबईतील खार भागात विशेष फिल्म्सच्या दुर्गा चेंबर्समधील ऑफिसमध्ये या शोचे नियोजन, स्क्रिप्टिंग आणि शेड्युलिंग आखण्याचे काम चालू आहे. दुर्गा चेंबर्समधील चौथा मजला भट्ट बंधूकडे आहे. या इमारतीचा दुसरा मजलादेखील त्यांनी खरेदी केला आहे. याच मजल्यावरती टीव्ही शोचे ऑफिस बनवण्यात आले आहे.
सूत्रांनुसार, सप्टेंबरपर्यंत या मालिका प्रसारित होणार आहेत. शिवाय विशेष फिल्म्स आपल्या हिट चित्रपटांचे सिक्वेल आणि रिबूटवरती काम करत आहे. टीव्ही मालिकेशी जोडणार्‍या कलावंतांना भट्ट कॅम्पच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळू शकते. इम्रान हाश्मीला सिनेतारा बनवल्यानंतर महेश भट्ट बर्‍याच दिवसानंतर त्याच्यासाठी दोन चित्रपट बनवत आहेत. शिवाय ते आशिकी, जन्नत आणि र्मडर सारख्या सुपरहिट चित्रपटांचा सिक्वल नवीन कलावंतांसमवेत बनवण्याच्या विचारात आहेत.
विशेष फिल्म्स साधारणत: 6 ते 10 कोटींच्या बजेटमध्ये चित्रपटाची निर्मिती करतो. मात्र, इम्रानच्या दोन चित्रपटांचे बजेट 40-40 कोटी इतके आहे. मुकेश भट्ट बजेटबरोबरच चित्रपटाच्या संगीतावर विशेष लक्ष देतात. भट्ट बंधू बनवत असलेल्या सिक्वेलमध्ये दिग्गज कलावंतांचा समावेश करणार नसल्याने नवीन चेहर्‍यांना संधी मिळणार आहे. आपल्या मालिकेसाठी विशेष फिल्म्स संघर्ष करत असलेल्या अनेक कलावंतांची भेट घेत आहे.