आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कॉमेडी नाइट्स...'मध्ये वरुण आणि दादीने केली धमाल-मस्ती, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज आणि अभिनेता वरुण धवन सध्या त्यांच्या 'मै तेरा हीरो' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अलीकडेच, सिनेमाचे दोन्ही मुख्य कलाकार सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिलचा लोकप्रिय 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी शोमध्ये आले होते. प्रमोशनदरम्यान त्यांच्यासोबत सिनेमाचे दिग्दर्शक डेविड धवनसुध्दा होते.
सिनेमाच्या दोन्ही मुख्य स्टार्सनी कपिलच्या शोमध्ये सिनेमाचे प्रमोशन तर केलेच, परंतु कॉमेडी आणि धमाल मस्तीही खूप केली. कपिलने इलियानासोबत डान्ससुध्दा केला. वरुणने एक जेष्ठ व्यक्तीच्या रुपात कॉमेडी शोमध्ये एंट्री केली. त्यानंतर कपिलच्या दादीसोबत खूप धमाल केली. एवढेच नाही तर, शोमध्ये वरुणने दादीला त्याच्या खांद्यावरसुध्दा बसवले होते.
'मै तेरा हीरो' हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे. डेविड धवन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. वरुण डेविड यांचा मुलगा असून तो पहिल्यांदा वडीलांच्या सिनेमात काम करत आहे. डेविड धवन यांचा हा सिनेमा 'कंदीरिगा'चा रिमेक आहे.
'मै तेरा हीरो' हा बालाजी मोशन पिक्चर्सचा सिनेमा आहे. त्याला अल्पना, शोभा आणि एकता कपूर यांनी मिळून निर्मित केले आहे. वरुण, इलियाना आणि नर्गिसचा हा सिनेमा 4 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कपिलच्या शोच्या सेटवर आलेल्या 'मै तेरा हीरो'च्या स्टार्सची काही खास छायाचित्रे...