आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Makar Sankranti Celebration On The Set Of Taarak Mehta Ka Ooltah Chas Makar Sankranti Celebration On The Set Of Taarak Mehta Ka Ooltah Chashmahhmah

PHOTOS: सेटवर साजरी केली संक्रात, 'जेठालाल'ने 'बबिता'सोबत उडवला पतंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अय्यर अर्थातच तनुज महाशब्दे आणि बबिता अर्थातच मुनमुन दत्ता यांच्यासोब पतंग उडवताना जेठालाल अर्थातच दिलीप जोशी)
मुंबई- सब टीव्हीवरीलस प्रसिध्द 'तारक मेहता का उल्टा चश्मा' शोच्या सेटवर 'मकर संक्राती'चा सण साजरा झाला. यावेळी जेठालाल, दयाबेन, बबिताजी, अय्यर आणि तारक मेहतासह टीव्हीचे इतर स्टारकास्ट पतंबाजी करताना दिसले. पतंगबाजीचा हा नजारा पाहण्यासारखा होता. कारण कुणाला पतंग उडवतान येत होता तर कुणाला नाही.
divyamarathi.comसोबत बातचीत करताना दयाबेन अर्थातच दिशा वाकाणीने सांगितले, 'मकर संक्राती हा सण माझ्यासाठी खूप खास आहे. मला पतंग उडवायला खूप आवडते आणि मला पतंग तयार करता येतो. या सणाशी जोडलेल्या अनेक आठवणी आहेत. आमची गोकुलधाम सोसायटीसुध्दा मकर संक्राती उत्साहात साजरी करत आहे आणि पतंगसुध्दा उडवत आहोत. आशा आहे, की प्रेक्षकांना हा एपिसोड नक्की आवडेल.'
यानेळी आम्ही शोमध्ये सोनूचे पात्र साकारत असलेल्या निधी भानुशालीसोबत बातचीत केली. त्याने सांगितले, 'प्रमाणिकपणे सांगतो, मला पतंग उडवता येत नाही. शूटिंगदरम्यान निर्मात्यांनी मला पतंग उडवण्यास सांगितले होते. परंतु हे माझ्यासाठी कठिण होते. पण मी या सणाला आणि क्षणाल माझ्या मित्रांसोबत-कुटुंबासोबत खूप एन्जॉय केले. माझा उद्देश काचेपासून बनवलेल्या मांजापासून पक्षांना वाचवण्याचा आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, की मांजा वापरू नका आणि पक्षी वाचवा.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'तारक मेहता...'च्या सेटवर मंकर संक्राती सेलिब्रेशनची छायाचित्रे...