आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही होती टीव्हीच्या \'वीरा\'ची मेकअप रुम, PHOTOSमधून पाहा आतील नजारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- छोट्या पडद्यावरील 'एक वीर की अरदास वीरा' हा शो लवकरच ऑफएअर होणार आहे. अलीकडचे याचा शेवटचा एपिसोड शूट करण्यात आला. यादरम्यान divyamarathi.comने शोची मुख्य अभिनेत्री दिगंगना सूर्यवंशीसोबत बातचीत केली. तिने आपल्या भावना आणि डोळ्यातील पाणी लपवून शोमधील काही आठवणी शेअर केल्या.
दिगंगनाने सांगितले, 'मला विश्वास आहे, की वीराच्या रुपात माझा प्रवास संपुष्टात येत आहे. मला आजसुध्दा असे वाटत आहे, की शूटिंगचे माझा पहिला दिवस आहे. शोशी निगडीत माझ्या अनेक आठवणी आहेत आणि माझ्यासाठी या आठवणी खूप खास आहेत. 'वीरा'दरम्यान मला खूप काही शिकायला मिळाले आणि पुढेही शिकत राहिल. चाहत्यांना गुडबाय म्हणणे कठिण वाटतय, परंतु मी वचन देते, की लवकरच नवीन प्रोजेक्ट्ससोबत पुनरागमन करेल.'
दिगंगनाने यादरम्यान आपल्या मेकअप रुमची झलकसुध्दा divyamarathi.comला दाखवली. तिच्या सांगण्यानुसार कधी-कधी तिला सेटवर 40 ताससुध्दा काम करावे लागत होते. ती आपल्या मेकअप रुमला घराप्रमाणे वापरत होती.
तिने सांगितले, 'मागील दोन वर्षांत माझा सर्वाधिक वेळ या रुममध्येच गेला. या रुमला माझ्या प्रत्येक गरजेच्या वस्तूने सजवलेले होते. आज येथून सर्व सामान मी घरी पाठवत आहे. खूप दु:ख होतय, कारण या रुमशी माझ्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. मला माझ्या मेकअप रुमची खूप आठवण येईल.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिगंगनाच्या मेकअप रुमचे Inside Photos...
सर्व फोटो: अजीत रेडेकर