आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India\'s Got Talent Pooja Is Also A Good Dancer, Planned Surprise Bit With Malaika

Oops! मलायका अरोरा खानचे झाले वार्डरोब मालफंक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्टेजवर परफॉर्म करताना 'इंडियाज गॉट टॅलेंट'मधील स्पर्धक पूजा)
मुंबईः 'इंडियाज गॉट टॅलेंट'चे सहावे पर्व लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होतंय. या शोच्या शूटिंगला मुंबईत सुरुवात झाली आहे. शोचा ओपनिंग एपिसोड शूट करत असताना मलायका अरोरा खान वार्डरोब मालफंक्शनला बळी पडली. डान्स करताना अचानक मलायकाच्या ब्लाउजच्या हुक्स निघाल्या. हे बघून तेथे उपस्थित सर्वच जण हैराण झाले. मात्र नंतर उघड झाले, की मलायका अरोरा खानचे नव्हे तर हुबेहुब तिच्यासारख्या दिसणा-या पूजाचे वार्डरोब मालफंक्शन झाले.
मलायकासोबत करण जोहर आणि किरण खेर या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. यंदाच्या पर्वात शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या पूजाला ऐन परफॉर्मन्सवेळी ड्रेसने दगा दिला. खरं तर यावेळी पूजा नव्हे तर मलायकाच स्टेजवर परफॉर्म करतेय, असा सर्वांचा समज झाला होता. याचे कारण म्हणजे पूजा हुबेहुब मलायकासारखी दिसते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलायका आणि पूजाने शोच्या संपूर्ण टीमला सरप्राइज देण्यासाठी ही योजना आखली होती. डान्स पूजा करत होती, मात्र सर्वांना वाटले की स्टेजवर मलायकाच हजर आहे. हा एपिसोड लवकरच ऑन एअर होणार आहे. इतकेच नाही तर पूजासोबत झालेली वार्डरोब मालफंक्शनची घटना पब्लिसिटी स्टंट असल्याचेही म्हटले जात आहे. आता सत्य काय, हे तर शोच्या टीमलाच ठाऊक. 'इंडियाज गॉट टॅलेंट सीजन-6' लवकरच कलर्स टीव्हीवर प्रसारित होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इंडियाज गॉट टॅलेंटच्या ओपनिंग एपिसोडमधील सेलिब्रिटींच्या परफॉर्मन्सची छायाचित्रे...