आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्वी झालेल्या ममताचा \'बिग बॉस\'च्या घरात जाण्यास नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिग बॉसचे सातवे पर्व लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. या पर्वासाठी बिग बॉसच्या निर्मात्यांनी स्पर्धकांची निवड सुरु केली आहे. शोचा टीआरपी वाढावा यासाठी काही वादग्रस्त सेलिब्रिटींची निवड या शोसाठी करण्यात येणार आहे.
या शोच्या निर्मात्यांनी वादग्रस्त अभिनेत्री ममता कुलकर्णीशी संपर्क साधला असून या शोमध्ये सहभागी होण्यासाठी ऑफर दिली आहे.
ममताला या शोमध्ये सहभागी होण्यासाठी निर्मात्यांनी मोठी रक्कमसुद्धा देऊ केली आहे. मात्र ममताने बिग बॉसची ही ऑफर नाकारली आहे.
जर ममताने ही ऑफर स्वीकारली असती तर नक्कीच प्रेक्षकांची या शोविषयीची रुची अधिक वाढली असती. गेल्या चौदा वर्षांपासून अज्ञात ठिकाणी असलेल्या ममताने अंडरवर्ल्ड डॉन विक्की गोस्वामीबरोबर लग्न केली असल्याची चर्चा आहे. तिच्या लग्नाच्या बातमीमुळे ममता ब-याच वर्षांनी लाईमलाईटमध्ये आली होती. ममताने मात्र लग्नाच्या बातमीचा इन्कार केला. शिवाय ममता साध्वी झाली असल्याचीही चर्चा आहे. ममता आपल्या काळातील प्रसिद्ध आणि सतत वादात राहणारी अभिनेत्री होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या ममता कोणकोणत्या वादात अडकली होती...