आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बिग बॉस 9\'च्या या कंटेस्टंटने अडीच महिन्यांत दुस-यांदा थाटले लग्न, शाहिद-मीरासह पोहोचले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 'बिग बॉस 9' मध्ये स्पर्धक म्हणून झळकलेल्या मंदाना करिमीने रविवारी बॉयफ्रेंड गौरव गुप्तासोबत लग्न थाटले. त्यानंतर त्यांच्या वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकता कपूरसह बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. टी-सीरीजचे मालक भूषण कुमार पत्नी दिव्या खोसला कुमारसोबत रिसेप्शनमध्ये पोहोचले. गौहर खान, वीजे बानी, करण टॅकर, क्रिस्टल डिसूजा, सुनील आणि कृषिका लुल्ला, डिझायनर मसाबा गुप्तासह अनेक सेलिब्रिटींनी नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
 
संगीत सेरेमनीत पत्नीसोबत पोहोचला होता शाहिद 
शनिवारी मंदानाची संगीत सेरेमनी झाली. यामध्ये शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत पोहोचला होता. शाहिद आणि मीरासह गौहर खान, वीजे बानी, तुषार कपूर, जया प्रदा, जाएद खान, आफताब शिवदासानी आणि साहिल संघासह अनेक सेलेब्स दिसले. 
 
जानेवारीत झाले होते कोर्ट मॅरेज.. 
मंदानाने याचवर्षी 25 जानेवारी रोजी गौरव गुप्तासोबत कोर्ट मॅरेज केले होते. मंदानाचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी 2011 मध्ये ललित तेहलानसोबत तिचे पहिले लग्न झाले होते.  
 

'गे'सोबत झाले होते पहिले लग्न...
- दिल्ली बेस्ड बिजनेसमन गौरव गुप्तासोबत मंदानाने दुसरे लग्न केले. 
- रिपोर्ट्सनुसार, 18 फेब्रुवारी 2011 रोजी आर्य समाज मंदिरात मंदानाने ललित तेहलानसोबत लग्न केले होते. मात्र लग्नाची बातमी तिने फेटाळून लावली होती. पण तिचे मॅरेज सर्टिफिकेट मीडियात लीक झाले होते. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, ललित तेहलान 'गे' आहे. तो फॅशन डिझायनर रोहित बलसोबत रिलेशनशिपमध्ये होता. ललित आणि रोहित यांना अनेकदा सार्वजनिक इंटीमेट होताना बघितले गेले.  
- 2011 मध्ये रोहितसोबत ब्रेकअपनंतर ललितने मंदानासोबत गुपचुप लग्न थाटले होते. तर काही मीडिया रिपोर्टनुसार, मंदानाने पहिले लग्न केवळ भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी केले होते.

कोण आहे मंदाना करिमी
- मंदानाचे वडील भारतीय वंशाचे तर आई ईराणी आहे. 
- तेहरानमध्ये मंदाना लहानाची मोठी झाली आहे. 
- 19 मार्च 1988 रोजी तेहरान (इराण)मध्ये जन्मलेल्या मंदानाने तिच्या करिअरची सुरुवात एअरहोस्टेस म्हणून केली होती. 
- मंदाना इराणी अभिनेत्री आहे. हाँगकाँगची एजन्सी मॉडेल मॅनेजमेंटमध्ये तिला दोन वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता.
- मंदानाने जेजे वाल्या, अबु जानी-संदीप खोसला, रोहित बल, आना सिंह, सत्या पॉल यांसारख्या प्रसिद्ध डिझाइनर्ससाठी रॅम्प वॉक केले आहे. 
- बॉलिवूड स्टार शाहरुख खानसोबत रॉय स्टॅग आणि करीना कपूरसोबत सोनी इरिक्सन या जाहिरातींमध्येही मंदाना झळकली आहे.
- मंदानाने क्वालालांपूर (मलेशिया)मधून मॉडेलिंगला सुरुवात केली होती.
- मंदानाला ऑगस्ट 2013च्या स्टफ इंडिया मॅगझिन आणि ऑक्टोबर 2013च्या क्रूज टुडेज या मॅगझिनच्या कव्हरपेजवर स्थान मिळाले होते. 
- मॉडेलिंगसोबतच मंडानाने विविध क्षेत्रात काम केले आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, मंदानाचे संगीत सेरेमनीपासून ते लग्न आणि वेडिंग रिसेप्शनचे खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...