एन्टरटेन्मेंट डेस्कः ईराणी ब्युटी मंदाना करिमी '
बिग बॉस'च्या नवव्या पर्वात सहभागी झाली आहे. घरात दाखल झाल्या झाल्या तिने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री होताच तिचा कुणाल खेमूसोबतचा इंटीमेट व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइट्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. 'भाग जॉनी' या सिनेमातील हा व्हिडिओ होता. हे होत नाही तोच तिच्याविषयी आता एक मोठा खुलासा झाला असून त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
बातम्यांनुसार, मंदानाचे मॉडेल ललित तेहलानसोबत लग्न झाले आहे. एका वृत्तपत्राने 2011 मध्ये मंदाना आणि ललितच्या लग्नाचे वृत्त प्रकाशित केले होते. शिवाय त्यांचे मॅरेज सर्टिफिकेट ऑनलाईन लीक झाल्याचा उल्लेख केला होता. मंदाना 'बिग बॉस'च्या घरात दाखल होताच तिच्या लग्नाविषयी चर्चा होऊ लागल्या आहेत.
पुढे वाचा, आर्य मंदिरात केले होते लग्न आणि सोबतच पाहा ललितसोबतची मंदानाची छायाचित्रे...