आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत इंजिनिअर होते 'तारक मेहता का उल्टा चश्मा'तील 'सेक्रेटरी भिडे'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता मंदार चांदवडकर)

एन्टरटेन्मेंट डेस्कः 'तारका मेहता उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेतील गोकुलधाम सोसायटी, जेठालाल, दया भाभीसह सर्वच पात्र घराघरांत प्रसिद्ध आहेत. हे सर्वजण जणू सामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भागच बनले आहेत. यापैकीच एक आहेत गोकुलधाम सोसायटीतील एकमेव सेक्रेटरी असलेले आत्माराम तुकाराम भिडे ज्यांना भिडे भाईच्या रुपात आयुष्यभराची ओळख प्राप्त झाली आहे. भिडे भाई अर्थातच अभिनेते मंदार चांदवडकर 90 च्या दशकात दुबईत इंजिनिअर म्हणून कार्यरत होते.
14 जून रोजी इंदोर येथे मुक्त संवादच्या वतीने आयोजित बालरंग उत्सवमध्ये सामील होणार आहेत. इंदोर हे त्यांचे सासर आहे. त्यांच्या पत्नी स्नेहल पाध्ये या इंदोरच्या आहेत. स्नेहल यांनाही अभिनयाची आवड आहे.
वाचा आमच्या सिटी भास्करसोबत मंदार यांनी केलेली खास बातचित...
राजकारण आणि सामान्यांच्या विचारातील फरक समजला
मंदार चांदवडकर यांनी सांगितले, ''तारक मेहता का उल्टा चश्मासोबत प्रेक्षक आश्चर्यकारकरित्या जुळले आहेत. लाहोर आणि कराचीमधून आलेले फोन कॉल्स आमच्यासाठी अत्यंत रोमांचक क्षण होता. तेथील लोकांनी फोन करुन काही एपिसोड्स भारत आणि पाकिस्तानला एकत्र आणण्याच्या उद्देशाने तयार करण्याची आम्हाला विनंती केली. देशातील राजकारण आणि सामान्यांच्या विचारात किती फरक आहे, हे या घटनेवरुन लक्षात येते.''
प्रसिद्धीसाठी टाइपकास्ट होण्याची भीती वाटत नाही
मंदार यांनी सांगितले, की भिडे भाई हे पात्र टाइपकास्ट झाले आहे, मात्र या पात्रानेच मला खरी ओळख मिळवून दिली आहे. या मालिकेने आम्हा कलाकारांना आर्थिक स्थैर्य दिले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मंदार चांदवडकर यांची निवडक छायाचित्रे...