आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मंदिरा बेदीसह या आहेत IPL च्या ग्लॅमरस होस्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोमध्ये मंदिरा बेदी आणि मयंती लेंगर)
मुंबईः प्रसिद्ध अभिनेत्री आणि प्रजेंटर मंदिरा बेदी हिचा आज वाढदिवस आहे. मंदिराने आज वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. 15 एप्रिल 1972 रोजी कोलकाता येथे तिचा जन्म झाला. ग्लॅमर, क्रिकेट आणि फॅशन आयकॉन असलेल्या मंदिराने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात 1994 मध्ये 'शांती' या मालिकेद्वारे केली होती. दुरदर्शनवर प्रसारित झालेली ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेत तिने शीर्षक भूमिका साकारली होती. त्यानंतर ती शाहरुख खान आणि काजोल स्टारर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमात सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली होती. 'क्योकीं की सास भी कभी बहू थी' या बालाजी टेलिफिल्म्सच्या मालिकेतही तिला महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. डेली सोपमध्ये विविधांगी भूमिका साकारल्यानंतर मंदिराने रिअॅलिटी टॅलेंट शोमध्ये सूत्रसंचालकाच्या रुपातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
2003 आणि 2007मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपचे होस्टिंग करणे, हा मंदिराच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला. यावेळी मंदिराने ग्लॅमरस अंदाजात कॉमेंट्री करुन सिद्ध केले, की या क्षेत्रात केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रियादेखील उत्तम कामगिरी बजावू शकतात. क्रिकेट वर्ल्डकपने मंदिराला संपूर्ण जगात लोकप्रियता मिळवून दिली. वर्ल्डकप व्यतिरिक्त मंदिराने आयपीएल आणि चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्येही आपल्या आवाजाचा जलवा दाखवता.
मंदिराच नव्हे तर प्रसिद्ध अँकर मयंती लेंगरदेखील कॉमेंट्रीत मागे नाहीये. क्रिकेटमध्ये ग्लॅमरचा तडका कसा लावावा, हे तिला चांगलेच माहित आहे. मयंतीने भारत आणि दक्षिण आफ्रिया यांच्यात झालेल्या टेस्ट सीरिजसाठी कॉमेंट्री केली होती. याशिवाय अलीकडेच पार पडलेल्या वर्ल्डकपदरम्यानही तिने आपल्या उत्कृष्ट कॉमेंट्रीने सर्वांची मने जिंकून घेतली. मयंती क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आहे.
Divyamarathi.com आज तुम्हाला क्रिकेट विश्वातील महिला अँकर्सची ओळख करुन देत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या निवडक फिमेल अँकर्सविषयी...