आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणिक ठरला 'इंडियाज गॉट टॅलेंट'चा विजेता, 50 लाखांचा ठरला मानकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विजेता ठरल्यानंतर जज किरण खेर यांचा आशीर्वाद घेताना माणिक पॉल)
मुंबईः शनिवारी रात्री 'इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 6' चा ग्रॅण्ड फिनाले पार पडला. अरुणाचल प्रदेशचा माणिक पॉल या शोचा विजेता ठरला. जजेस किरण खेर, करण जोहर आणि मलायका अरोरा खान यांनी माणिकच्या नावाची घोषणा करताच त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
'नहीं सामने ये अलग बात है' या गाण्यावर माणिकने ग्रॅण्ड फिनालेत परफॉर्म केले. माणिकला पुरस्काराच्या रुपात ट्रॉफीसह पन्नास लाख रुपये आणि मारुती सुझुकी सेलेरियो कार मिळाली.
विजेता ठरल्यानंतर माणिकने सांगितले, ''मला येथे खूप काही शिकायला मिळाले. माझी मोठी स्वप्ने आहेत. या जिंकलेल्या रकमेतून मी सर्वप्रथम घर खरेदी करणार आहे.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या फिनालेचे Inside Photos...