आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनू पंजाबीला पराभूत करुन यांनी जिंकले Bigg Boss Finale चे तिकीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉलच्‍या बाहेर मतांसाठी अपिल करताना मनवीर गुर्जर. - Divya Marathi
मॉलच्‍या बाहेर मतांसाठी अपिल करताना मनवीर गुर्जर.
मुंबई - 'बिग बॉस- 10' च्‍या ग्रँड फिनाले टास्‍कसाठी मनवीर गुर्जरला तिकीट मिळाले आहे. मनू पंजाबीला पराभूत करुन त्‍याने तिकीट मिळविले आहे. बिग बॉसच्‍या ग्रँड फिनालेसाठी सध्‍या स्‍पर्धकांमध्‍ये  स्पर्धा सुरु आहेत. ग्रँड फिनालेचे तिकीट मिळवण्‍यासाठी मनवीर गुर्जर आणि मनू पंजाबीला एका मॉलमध्‍ये लोकांचे मत मिळवण्‍यासाठी पाठविले होते. यामध्‍ये मनवीरला मनू पंजाबीपेक्षा जास्‍त मते मिळाली. याआधीही मनू गुर्जरला विविध टास्‍कमध्‍ये लोकांचा भरपूर पाठिंबा मिळाला आहे. 
 
28 जानेवारीला होऊ शकतो फिनाले... 
बिग बॉसच्‍या 10व्‍या सिझनचा ग्रँड फिनाले कधी होणार याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र 28 जानेवारीला फिनाले होण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे. फिनालेसाठी अजूनही अंतिम स्‍पर्धकांची निवड झालेली नाही. त्‍यामुळे फिनालेमध्‍ये कोण कोण असणार याबद्दल प्रेक्षकांमध्‍ये उत्‍सूकता आहे.   
 
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, बिग बॉसमध्‍ये कसा आला मनवीर गुर्जर 

 
 
बातम्या आणखी आहेत...