आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्पिटलमध्‍ये अॅडमिट मनवीर गुर्जरने सोडले मौन, जाणून घ्‍या विवाहाबद्दल काय म्‍हणाला मनवीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई- आपल्‍या विवाहामुळे 'बिग बॉस-10'चा विजेता मनवीर गुर्जर सध्‍या चर्चेत आहे. याबाबतीत अद्याप त्‍याने मौन बाळगले होते. मात्र इन्‍स्‍टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्‍ट करुन त्‍याने आपले मौन सोडले आहे. या व्हिडिओमध्‍ये मनवीरने मान्‍य केले आहे की, त्‍याचा विवाह झाला होता. त्‍याने म्‍हटले आहे की, 'विवाहाची गोष्‍ट जाणिवपूर्वक इतरांपासून आपण लपविलेली नाही. माझी अशी कोणतीही स्‍ट्रॅटजी नव्‍हती.'
 
व्हिडिओमध्‍ये आणखी काय म्हणाला मनवीर? 
- मनवीरने म्‍हटले आहे की, 'मी कधीही माझा विवाह लपवण्‍याचा प्रयत्‍न केला नाही. 2014मध्‍ये माझे कुटुंब आणि काही भावनिक कारणांमुळे मला विवाह करावा लागला. मात्र 4-5 महिन्‍यांतच आमच्‍या दोघांच्‍या नात्‍यांत फार तणाव निर्माण झाला. त्‍यामुळे आम्‍ही वेगळे होण्‍याचा निर्णय घेतला. बिग बॉसमध्‍ये विवाहाला लपविण्‍याबद्दल माझी कोणतीही स्‍ट्रॅटजी नव्‍हती. माझा विवाह लपवून बिग बॉसमध्‍ये याचा फायदा उठवण्‍याचा मी कधीही प्रयत्‍न केला नाही. तसेच शोमध्‍ये कुणाला फसवण्‍याचा मी विचार केला नाही किंवा तसे प्रयत्‍नही कधी केले नाही. 
 
हॉस्पिटलमध्‍ये अॅडमिट आहे मनवीर 
मनवीर सध्‍या आजारी असून तो हॉस्पिटलमध्‍ये अॅडमिट आहे. मनवीर वाढत्‍या तापाने त्रस्‍त आहे. इन्‍स्‍टाग्रामवर याबद्दल पोस्‍ट करुन त्‍यांनी सांगितले आहे की, त्‍याला फुड पॉयझनिंग झाले आहे. यानंतर 3 तासाने मनवीरने हा व्हिडिओ पोस्‍ट केला. 
 
मनवीरवर पोलिसांनी दाखल केली आहे केस 
मनवीरवर IPC-341 अंतर्गत उत्‍तर प्रदेश पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मनवीरचे कुटुंब आणि त्‍याच्‍या काही मित्रांनी नोएडाच्‍या सेक्‍टर 46मधील पार्कमध्‍ये एका सोहळयाचे आयोजन केले होते. या सोहळ्यासाठी नोएडा पोलिसांनी 40 वाहनांची परवानगी दिली होती. मात्र मनवीरचे कुटुंबीय व त्‍याच्‍या मित्रांनी यापेक्षा 25 पटीने जास्‍त वाहने तिथे आणली. पार्कजवळ 1000पेक्षा जास्‍त वाहनांची गर्दी झाल्‍यामुळे तेथील नागरिकांना याचा फार त्रास सहन करावा लागला. शेवटी लोकांनी पोलिसांकडे तक्रार केल्‍यानंतर पोलिसांनी मनवीर विरोधात FIR दाखल केली. 
 
विवाहामुळे चर्चेत आहे मनवीर 
- काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्‍हायरल झाला होता. 
- यामध्‍ये मनवीर त्‍याच्‍या कुटुंबियांच्‍या उपस्थितीत विवाहाच्‍या वेशभुषेत घोडीवर चढताना दिसत आहे. 
- त्‍याला तीन वर्षांची मुलगी असल्‍याचे वृत्‍त यानंतर आले होते. 
- माध्‍यामांमध्‍ये हे वृत्‍त येताच मनवीरच्‍या फॅन्‍सनी त्‍याच्‍यावर आरोप केला की, मनवीरने जाणिवपूर्वक आपला विवाह लपवून ठेवला आणि असे करुन त्‍याने आमचा विश्‍वासघात केला आहे.
- मात्र 'बिग बॉस 10' सिझनच्‍या चौथ्‍या दिवशीचा एपिसोड  'Day 4: Om Baba Gets Jailed' मध्‍ये मनवीरने व्हिजे बानीला आपण विवाहीत असल्‍याचे सांगितले होते. 
- मनवीर म्‍हणाला होता, 'वयाच्‍या 22व्‍या वर्षीच त्‍याला लग्‍नासाठी उभे केले गेले होते.'
- यावर बानीने विचारले होते की, 'बिग बॉसमध्‍ये येण्‍याबद्दल तुझ्या पत्‍नीची काय प्रतिक्रीया होती?' तेव्‍हा मनवीर म्‍हणाला होता, 'पत्‍नी आणि आई वगळता इतर कोणालाही मी बिग बॉसमध्‍ये येण्‍याबद्दल सांगितलेले नाही.' 
- मनवीर पुढे म्‍हणाला होता, 'त्‍याची एक 3 वर्षांची मुलगी आहे. तिच नाव विविशा आहे.'
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, मनवीरने इन्‍स्‍टाग्रामवर पोस्‍ट केलेला व्हिडिओ आणि त्‍याच्‍या विवाहाबद्दल मोनालिसा, त्‍याची आई आणि नातेवाईक काय म्‍हणाले... 
 
     
 
बातम्या आणखी आहेत...