आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बिग बॉस\' स्‍पर्धकाने केला लव्‍ह लाईफचा खुलासा, नाही राहिला रिलेशनशिपवर विश्‍वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनवीर गुर्जर आणि लोपा मुद्रा. - Divya Marathi
मनवीर गुर्जर आणि लोपा मुद्रा.
मुंबई - 'बिग बॉस-10' स्‍पर्धक मनवीर गुर्जरने बिग बॉस शोमध्‍ये लोपा मुद्राशी बोलताना आपल्‍या आयुष्‍यातील एक गुपित उघड केले आहे. दोघेही घरात गप्‍पा मारत होते. यादरम्‍यान लोपाने मनवीरला त्‍याच्‍या आयुष्‍यात आलेल्‍या मुलींबद्दल विचारले, तेव्‍हा मनवीरने सांगितले की त्‍याने एका मुलीवर खूप प्रेम केले होते. मात्र काही वर्ष रिलेशनशिपमध्‍ये राहिल्‍यावर तिने मनवीरला सोडून दिले. तेव्‍हापासून रिलेशनशिपवरील विश्‍वास उडाला आहे, असे मनवीरने सांगितले.  
 
या गोष्‍टींचाही केला खुलासा 
मनवीरने आपल्‍या आयुष्‍यातील प्रेमविरहाबद्दल लोपाशी अगदी मनमोकळेपणाने गप्‍पा मारल्‍या. याचवेळी आणखी एक गुपित त्‍याने उघड केले. लोपाने मनवीरला 10वी च्‍या निकालाबाबत विचारले असता मनवीरने सांगितले की, त्‍याने आठवीतच शिक्षण सोडले आहे. हे एकूण लोपा आश्‍यचर्यचकीत झाली. मात्र शिक्षण का सोडले, हे मनवीरने सांगितले नाही. 
 
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मनवीरबाबत काही खास गोष्‍टी...