आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mardaani Rani Mukerji Visits 'Jhalak Dikhhla Jaa 7' Sets!

PIX: 'झलक दिखला जा'च्या सेटवर अवतरली 'मर्दानी' राणी, माधुरीसह धरला ताल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांमध्ये माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी आणि मनीष पॉल)
मुंबई - 'झलक दिखला जा'च्या सेटवर अलीकडेच अभिनेत्री राणी मुखर्जी आपल्या आगामी मर्दानी सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. यावेळी राणीने माधुरीसह देवदास सिनेमातील डोला रे डोला या गाण्यावर ताल धरला.
सेटवर राणी आणि माधुरीची जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळाली. या दोघींमध्ये शूटिंगच्या ब्रेकमध्ये ब-याच गप्पा रंगल्या होत्या. याशिवाय दोघींनी बरीच छायाचित्रे काढून घेतली. या दोघींसह या शोचा होस्ट मनीष पॉलनेही भरपूर धमाल केली. राणी सिंपल ब्लॅक ड्रेसमध्ये सेटवर अवतरली होती. या सिंपल ड्रेसमध्येसुद्धा राणी खूप सुंदर दिसली. तिने पायात हायहिल्सची सँडल घातली होती.
राणीची प्रमुख भूमिका असलेला 'मर्दानी' हा अॅक्शन ड्रामा सिनेमा असून यावर्षी 22 ऑगस्टला रिलीज होणार आहे. प्रदीप सरकार दिग्दर्शित या सिनेमात राणीने क्राइम ब्रांच ऑफिसरची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी राणीने भरपूर रिसर्च केला आहे. राणीसह जिशू सेन गुप्ताचीही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. आदित्य चोप्रा या सिनेमाचा निर्माता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'झलक दिखला जा'च्या सेटवर क्लिक झालेली राणीची खास छायाचित्रे...