(छायाचित्रः पती नीरज भारद्वाजसह उपासना सिंह)
चंदीगडः बिट्टूची 22 वर्षीय पिंकी बुआचे अद्याप लग्न ठरत नाहीये. '
कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये पिंकी बुआ योग्य वराच्या शोधात आहे. प्रत्येकवेळी ती
आपल्यासाठी योग्य वराचा शोध घेताना आपल्याला दिसत असते. तसं पाहता कपिलची ही पिंकी बुआ खासगी आयुष्यात मात्र
विवाहित असून सुखी आयुष्य व्यतित करत आहे.
उपासना सिंह (पिंकी बुआ) सांगते, ''माझ्यात आणि पिकींत काहीही साम्य नाहीये. मी खूप रिजर्व आहे. माझा जन्म होशियापूरमधला आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीत मी लहानाची मोठी झाली. मोठ्यांचा आदर करणे, त्यांचे म्हणणे ऐकणे, हे संस्कार माझ्यावर झाले आहेत. कॉलेजातून थेट मी घरी यायचे. बाहेर कुठेही फिरण्याची परवानगी नव्हती. मला ठाऊक असायचे ही मुले माझा पाठलाग करत आहेत, मात्र कधीही रिअॅक्ट व्हायची माझी हिंमत झाली नाही.
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोने माझी ओळखच बदलून टाकली. या कॅरेक्टरमुळे मी खरंच लग्नासाठी उत्सुक असल्याचे प्रेक्षकांना वाटते. माझ्या
फेसबुक वॉलवर मला दररोज लग्नाची मागणी येत आहे. विचित्र पद्धतीने लग्नासाठी मागणी घातली जाते. यामध्ये 20 ते 60 वर्षे वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे. एकदा एका मॉलमध्ये एका वयस्कर व्यक्तीने सर्वांसमोर मला लग्नाची मागणी घातली होती. ती व्यक्ती म्हणाली होती, की माझ्याशी लग्न कर, मी तुला नेहमी आनंदात ठेवील. त्यांना मला समजवावे लागले, की मी विवाहित असून माझ्या नव-याचे माझ्यावर खूप प्रेम आहे. माझे लग्न अभिनेता नीरज भारद्वाजसह झाले आहे. खासगी आयुष्यात कधीही आमच्या विवाहित आयुष्यात अडचणी आलेल्या नाहीत. दुरदर्शनवरील एका मालिकेत आम्ही एकत्र काम करत होते. त्याचकाळात नीरजने मला प्रपोज केले. आमच्या अनेक गोष्टी जुळत असल्यामुळे आम्ही लग्नाला होकार दिला.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा उपासना सिंहची तिचे पती नीरज भारद्वाजसोबतची खास छायाचित्रे...