आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे पूजा बेदीची मुलगी, फोटोजवर आलेल्या अश्लिल कमेंटला दिले होते सडेतोड उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः माजी बॉलिवूड अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट पूजा बेदी हिने वयाची 47 वर्षे पूर्ण केली आहेत. 11 मे 1970 रोजी मुंबईत पूजाचा जन्म झाला. प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेते कबीर बेदी यांची पूजा मुलगी आहे. 1991 मध्ये 'विषकन्या' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 
 
नव-यापासून घेतला पूजाने घटस्फोट...  
पूजाने 1994 मध्ये गुएट्टा इब्राहिम फर्नीचरवालासोबत लग्न केले होते. 1990 मध्ये दोघांची भेट झाली होती. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. उमर इब्राहिम हे मुलाचे तर आलिया इब्राहिम हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. लग्नाच्या आठ वर्षांनी पूजा आपल्या नव-यापासून विभक्त झाली. 2003 मध्ये दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. त्यानंतर पूजा टीव्ही अभिनेता आकाशदीप सहगलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र लवकरच ती त्याच्यापासूनही विभक्त झाली. 
 
मुलगी आलिया बनवतेय फॅशन इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख...
पूजा बेदीची मुलगी आलियाचा जन्म 1997 मध्ये झाला. बातम्यांनुसार, आलिया फॅशन इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असून बॉलिवूडचेही तिला वेध लागले आहेत. 2011 मध्ये सोनी इंटरनॅशनल वाहिनीच्या एका रिअॅलिटी शोमध्ये आलिया झळकली आहे. या शोमध्ये ती आपल्या आईसोबत स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. 

फोटोजवर आलेल्या अश्लिल कमेंट्ला दिले होते आलियाने सडेतोड उत्तर... 
आलिया नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचे ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते. एका वेबसाइटने आलियाचे हे फोटोज प्रकाशित केले होते. या फोटोजवर अनेक अश्लिल कमेंट्स आले होते. ते वाचून आलिया नाराज झाली होती. तिने या कमेंट्सवर सडेतोड उत्तर दिले होते. आलियाने तिच्या ब्लॉगवर लिहिले होते, ''मी स्वतःविषयी एक बातमी वाचली, जी अगदी योग्यपद्धतीने लिहिण्यात आली होती. त्या बातमीत सर्व काही आदरयुक्त लिहिण्यात आले होते. मात्र जेव्हा मी त्या बातमीवर आलेल्या प्रतिक्रिया वाचल्या, तेव्हा मात्र मला धक्काच पोहोचला. कारण प्रत्येकजण माझ्या कपड्यांवर प्रश्न उपस्थित करत होता. माझ्यासाठी 'स्लट' आणि 'पोर्नसाठी तयार' अशा शब्दांचा वापर करण्यात आला होता. पहिले तर मी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र मला त्या कमेंट्स वाचून अस्वस्थ वाटू लागले आणि मी त्याला उत्तर द्यायचे ठरवले.''
 
आलियाने पुढे लिहिले होते, ''जर माझे क्लिवेज दिसतायेत, याचा अर्थ हा होत नाही, की मी तुम्हाला माझ्याविषयी काहीही बोलण्याची परवानगी दिलीये. माझ्या ब्रेस्टव्यतिरिक्तसुद्धा मी खूप काही आहे. केवळ या एका गोष्टीने तुम्ही मला सिद्ध करु शकत नाहीत.''
 
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आलिया अब्राहमची गेल्या काही दिवसांत इन्स्टाग्रामवर शेअर झालेली छायाचित्रे...
 
बातम्या आणखी आहेत...