आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे कॉमेडिअन अहसान कुरैशीची 20 वर्षीय मुलगी, बघा फॅमिली PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अहसान कुरैशी यांची गणना भारतातील आघाडीच्या विनोदवीरांमध्ये होते. दीर्घ काळापासून लाइमलाइटपासून दूर असलेल्या अहसान कुरैशी यांची divyamarathi.com ने अलीकडेच भेट घेतली. याकाळात त्यांनी त्यांना करावा लागलेला संघर्ष, लव्ह स्टोरी आणि कुटुंबीयांविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अहसान यांच्या कुटुंबीयांविषयी सांगायचे झाल्यास, त्यांच्या घरी त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांची मुलगी सुम्बुल 20 वर्षांची असून मुंबईतील SNDT कॉलेजमध्ये मीडिया विषयात शिक्षण घेत आहे. तर मुलगा अहतेशान अकरावीत शिकत आहे. मुलाला संगीताची विशेष आवड आहे.

चार वर्षांच्या अफेअरनंतर झाले लग्न...
अहसान यांनी आपल्या लव्ह स्टोरीविषयी सांगितले. ते म्हणाले, "1990 मध्ये माझी आणि झीनतची भेट झाली. एका लिट्रेसी कॅम्पेनमध्ये आम्ही भेटलो होतो. झीनत मुलींच्या ग्रुपची तर मी मुलांच्या ग्रुपचा हेड होतो. सुरुवातीला आमच्यात बरेच मतभेद होते. मात्र कॅम्पेन संपता संपता आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडले. रिलेशनशिपला पुढील टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी आम्हाला चार वर्षे लागली. लग्नापूर्वी मला फायनॅन्शिअल सेटल व्हायचे होते. 1994 मध्ये आम्ही लग्न केले."

पुढील स्लाईड्समध्ये बघा, अहसान यांच्या कुटुंबीयांची खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...