आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss 8 : Meet Aparna Joshi The Alleged Girlfriend Rahul Mahajan

पत्नीला सोडून या मॉडेलसोबत LIVE-IN मध्ये राहतोय राहुल महाजन, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः राहुल महाजन आणि अपर्णा जोशी)
मुंबईः 'बिग बॉस'च्या घरात अलीकडेच संभावना सेठला राहुल महाजन आणि डिंपीविषयी गॉसिप करताना बघितले गेले. तिच्या मते, बिग बॉसच्या घरात राहुल डिंपीवरचे आपले प्रेम व्यक्त करतोय, मात्र बाहेर मॉडेल अपर्णा जोशीला डेट करतोय. तेव्हापासून अपर्णा जोशी चर्चेत आली असून तिची फेसबुकवरची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल महाजन सध्या मुंबईस्थित मॉडेल अपर्णा जोशीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. तर त्याची पत्नी डिंपी महाजन दुबईतील एका बिझनेसमनला डेट करतेय. राहुलने अद्याप अपर्णा आणि त्याच्या नात्याला सार्वजनिकरित्या स्वीकारलेले नाही.
राहुलने 2010मध्ये 'राहुल दुल्हनिया ले जाएगा' या रिअॅलिटी शोमध्ये डिंपी गांगुलीची पत्नीच्या रुपात निवड केली होती. लग्नाच्या चार महिन्यांतच डिंपीने राहुलवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला होता. मात्र काही दिवसांनी हे दोघे पुन्हा एकत्र नांदू लागले होते. पण 2014 मध्ये पुन्हा एकदा त्यांच्यातील वाद वाढला आणि त्यांनी कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा राहुल महाजनची कथिक लिव्ह इन पार्टनर अपर्णा जोशीची छायाचित्रे...