आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा 'सतरंगी ससुराल'च्या आरुषीला, पाहा खासगी आयुष्यातील निवडक Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः मुग्धा चाफेकर)
मुंबईः 2006 मध्ये छोट्या पडद्यावर एक ऐतिहासिक मालिका दाखल झाली होती, त्या मालिकेला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली होती. त्या मालिकेचे नाव होते 'धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान'. स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित झालेल्या या मालिकेतील पृथ्वीराज आणि संयोगिताची जोडी प्रेक्षकांना भावली होती. या मालिकेत अभिनेता रजत टोकस आणि मुग्धा चाफेकर या कलाकारांनी पृथ्वीराज आणि संयोगिताचे पात्र साकारले होते.
रजत टोकस सध्या 'जोधा अकबर' या मालिकेत अकबराच्या भूमिकेत दिसत आहे. तर मुग्धाने अलीकडेच 'सतरंगी ससुराल' या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. या मालिकेत अभिनेता रविश देसाई मुग्धासोबत मेन लीडमध्ये आहे. जाणून घेऊया 'सतरंगी ससुराल'मधील आरुषी अर्थातच मुग्धा चाफेकरविषयी...
मुंबईत झाला जन्म...
मुग्धा चाफेकरचा जन्म मुंबईत 24 जून 1987 रोजी एका मराठी कुटुंबात झाला. येथील रुपारेल कॉलेज माटुंगा येथून मुग्धाने इंग्लिश लिटरेचरमध्ये मास्टर डिग्री प्राप्त केली आहे.
वयाच्या पाचव्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात...
मुग्धाला लोक 'धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान'मधील संयोगिताच्या रुपात ओळखतात. मात्र मुग्धाने वयाच्या पाचव्या वर्षापासूनच कॅमे-यासमोर काम करायला सुरुवात केली. 1995 मध्ये रिलीज झालेल्या धर्मेंद्र आणि सचिन स्टारर 'आजमाइश' या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केले होते.
याशिवाय 2003 मध्ये 'जस्सी जैसी कोई नहीं' या मालिकेतही मुग्धा झळकली होती. 'धरम वीर' (2008), 'मेरे घर आई एक नन्हीं परी' (2009) आणि 'सजन रे झूठ मत बोलो' (2009-2012) या मालिकांमध्ये मुग्धाने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मुग्धाची खासगी आयुष्याची झलक छायाचित्रांमध्ये...