आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळखलंत का \'भाभीजी\'च्या हप्पू सिंहला... Real lifeमध्ये आहे हॅण्डसम, Pics बघा विश्वास बसेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या भाभीजी घर पर है या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. अलीकडेच ही मालिका शिल्पा शिंदेसोबतच्या वादामुळे चर्चेत आली होती. आता शिल्पा शिंदेच्या जागी दुस-या अभिनेत्रीची वर्णी लागली आणि मालिका पुन्हा एकदा सुरळीत सुरु झाली. या मालिकेतील पोलिस हप्पू सिंहला तुम्ही ओळखतात... त्यांच्या नऊ मुले आणि पत्नीचे किस्से खूप ऐकले आहेत. मात्र त्यांना अद्याप मालिकेत काही बघता आलेले नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला त्यांच्या रिअल लाइफ पत्नीशी भेट घालून देत असून त्यांच्या खासगी आयुष्याविषयी सांगत आहोत. हप्पू सिंह यांचे खरे नाव योगेश त्रिपाठी आहे.
खासगी आयुष्यात स्लिमट्रीम आहेत योगेश त्रिपाठी...
भाभीजी घर पर है या मालिकेत गोलमटोल आणि केसांच्या विशिष्ट ठेवणसाठी हप्पू सिंहला ओळखले जाते. मात्र खासगी आयुष्यात योगेश त्रिपाठी अगदी स्लिमट्रीम आहेत. हप्पू सिंहसारखे त्यांचे पोट सुटलेले नाही. योगेश यांचे लग्न झालेले असून त्यांच्या पत्नीचे नाव सपना आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आहे. गंमतीचा भाग म्हणजे त्यांचा मुलगासुद्धा त्यांना हप्पू सिंह म्हणून हाक मारतो.
बातम्या आणखी आहेत...