आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Bigg Boss'ची स्पर्धक दीपशिखाने दोनदा केले आहे लग्न, पाहा दुस-या पतीसोबतचे Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- दीपशिखा आणि तिचा दुसरा पती केशव अरोरा)
मुंबई: दीपशिखा 'बिग बॉस 8'ची एकमेव विवाहित महिला स्पर्धक आहे. शनिवारी (11 ऑक्टोबर) तिने आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास केला होता. दीपशिखाने 2012मध्ये केशव अरोराशी लग्न केला. हे तिचे दुसरे लग्न आहे. यापूर्वी ती 1997मध्ये मल्याळम आणि हिंदी सिनेमाचा अभिनेता उपेंद्रसोबत विवाह बंधनात अडकली होती. 2007मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. तिचा आत्ताचा पती अर्थातच केशव हा एक मॉडेल आणि अभिनेता आहे. 2011मध्ये त्याने 'ये दूरिया' सिनेमात काम केले होते.
विशेष म्हणजे, या सिनेमाची दिग्दर्शिका-निर्माती आणि मुख्य अभिनेत्रीसुध्दा दीपशिखाच होती. रिअल लाइफ पती केशवने या सिनेमामध्ये दीपशिखासोबत काम केले होते. दीपशिखाने यापूर्वी 'कोयला' (1997),'बादशाह' (1999),'रिश्ते' (2002), 'पार्टनर'(2007) आणि 'गांधी टू हिटलर' (2011)सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. मुख्य भूमिकेत ती पहिल्यांदा 'ये दूरिया' सिनेमांतच झळकली.
डान्सिंग शोमध्ये पतीसोबत दिसली
दीपशिखा आणि तिचा पती केशव 2013मध्ये स्टार प्लसच्या 'नच बलिए' या डान्सिंग शोमध्ये सहभागी झाले होते. मात्र या शोमध्ये ते जास्त दिवस टिकू शकले नाही.
पहिल्या पतीपासून दोन मुले
दीपशिखाला तिच्या पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. मुलगी वेधिका आणि मुलगा विवान उपेंद्र अशी त्यांची नावे आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दीपशिखाची दुसरा पती केशवसोबतची छायाचित्रे...