आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss: Meet Gauri Sandhu The Girlfriend Of Ali Quli Mirza

Bigg Boss: ही आहे अली कुली मिर्झाची गर्लफ्रेंड गौरी संधू, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : गौरी संधू आणि अली कुली मिर्झा)
मुंबईः 'अलीशिवाय बिग बॉस अपूर्ण आहे', हे म्हणणे आहे अली कुली मिर्झाची गर्लफ्रेंड गौरी संधूचे. गौरी आणि अली गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. divyamarathi.comसोबत बातचीत करताना गौरी अलीविषयी मनमोकळेपणाने बोलली. ती म्हणाली, "अली बिग बॉसमधील सर्वात एंटरटेनिंग स्पर्धकांपैकी एक आहे. विजेता होण्याची योग्यता त्याच्यात आहे. बिग बॉसच्या घरात जेव्हा अलीची एन्ट्री झाली, तेव्हा घरात निगेटिव्हिटी पसरली होती. मात्र त्याच्या एन्ट्रीने घरात पुन्हा ऊर्जा संचारली. अलीने मनोरंजन करुन लाखो लोकांची मने जिंकली. तो या शोचा विजेता ठरावा, अशी मी प्रार्थना करते."
एजाज खानच्या रिएन्ट्रीमुळे गौरी दुःखी आहे. ती म्हणते, "अलीला का टार्गेट करण्यात येतंय, हे मला समजत नाहीय. माझ्या मते शोचे मेकर्स अलीच्या साध्या स्वभावाचा गैरफायदा घेत आहेत. एजाजने अलीसोबत गैरवर्तन केले, मात्र अलीने त्याकडे दुर्लक्ष केले. आता एजाजला पुन्हा एकदा घरात प्रवेश देण्यात आला आहे. याची गरज काय होती. जेव्हा सोनालीने अलीला थोबाडीत मारले होते, त्यावेळी निर्मात्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. अली नेहमी स्वतःला कंट्रोल करतो. जेव्हा गौतम भांडणाची ठिणगी टाकतो, इतर स्पर्धकांना भडकावतो, तेव्हा सर्वजण त्यालाच साथ देतात. अली गेम खेळत नाहीये, तो जसा बाहेर आहे, तसाच घरात वागतोय."
बिग बॉसच्या ग्रॅण्ड फिनालेत सहभागी होणार असल्याचे गौरीने सांगितले. तिने सांगितले, "होय, मी ग्रॅण्ड फिनालेत सहभागी होण्यासाठी लोणावळ्याला जाणार आहे. अलीच बिग बॉसचा विजेता ठरेल, अशी मला आशा आहे."
गौरी संधू माजी मॉडेल आणि योगा टीचर आहे. काही दिवसांपूर्वी एका टास्कदरम्यान गौरी बिग बॉसच्या घरात आली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अली कुली मिर्झाची गर्लफ्रेंड असलेल्या गौरीची खास छायाचित्रे...