आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS@B'day: 47 वर्षांचे झाले 'जेठालाल', हे आहे त्यांचे खरे कुटुंब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[पत्नी जयमाला जोशी(डावीकडे), मुलगी नियती आणि मुलगा ऋत्विकसोबत दिलीप जोशी]
मुंबईः 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांनी आज वयाची 47 वर्षे पूर्ण केली आहेत. 26 मे 1968 रोजी गुजरात येथील पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला. शोमध्ये त्यांची आणि दयाबेन उर्फ दिशा वाकाणी यांची अफलातून केमिस्ट्री प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. रिअल लाईफमध्येही दिलीप जोशी विवाहित आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव जयमाला जोशी आहे. दिलीप आणि जयमाला जोशी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नियती हे मुलीचे तर ऋत्विक हे त्यांच्या मुलाचे नाव आहे.
टीव्हीच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही केले आहे काम...
दिलीप जोशी यांना लोक 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील जेठालाल नावाने ओळखतात. मात्र त्यांनी 'मैंने प्यार किया' (1989), 'हम आपके हैं कौन' (1998), 'फिर भी दिल है हिन्दुस्तानी' (2000), 'हमराज' (2002) आणि 'फिराक' (2008) सह दहा हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
निवडक टीव्ही मालिका...
'गलतनामा' (1994), 'दाल में काला' (1998), 'हम सब एक हैं' (1998-2001), 'हम सब बाराती' (2004), 'FIR (2008) और 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (2008 पासून सुरु)
जेठालाल यांची ऑनस्क्रिन फॅमिली प्रेक्षकांनी पाहिलीच आहे. मात्र Divyamarathi.com आज तुम्हाला त्यांच्या रिअल लाइफ फॅमिलीची निवडक छायाचित्रे दाखवत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, दिलीप जोशी यांची त्यांच्या कुटुंबीयांसोबतची खास छायाचित्रे...