आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भेटा B'day गर्ल श्वेता तिवारीच्या ग्लॅमरस मुलीला, लवकरच घेणार बॉलिवूडमध्ये एंट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आज (4 ऑक्टोबर) वाढदिवस साजरा करत आहे. श्वेताला एक मुलगी आहे. तिचे नाव आहे पलक. पलकही आईच्या पावलावर पाऊल ठेवत अॅक्टींगमध्ये करिअर करण्याच्या मार्गावर आहे. पण टीव्हीवर नव्हे तर बॉलिवूडमधून ती सुरुवात करणार असल्याची माहिती आहे. काही निर्मात्यांशी बोलणी सुरू असून लवकरच पलक चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या बातम्यांनुसार ती ‘क्विकी’ नावाच्या सिनेमातून अभिनेता दर्शील सफारीबरोबर दिसण्याची शक्यता आहे. स्वतः श्वेताने पलक बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार असल्याचे सांगितले आहे. 

श्वेता आणि राजा चौधरीची मुलगी आहे पलक...
पलक ही श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे. 2007 साली श्वेता आणि राजा चौधरीचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर पलकची संपूर्ण जबाबदारी श्वेताने स्वीकारली. त्यानंतर श्वेताने दुसरा विवाह केला. अभिनय हे तिच्या दुस-या नव-याचे नाव आहे. अभिनय आणि श्वेताला एक मुलगा आहे. 'कसौटी जिंदगी की', 'झलक दिखला जा' आणि 'बिग बॉस' या टीव्ही शोसाठी श्वेता प्रसिद्ध आहे.

आईच्या पावलावर पलकचे पाऊल...
श्वेता तिवारी हिच्या बोल्डनेसची चर्चा नेहमीच रंगत असते. पलकनेसुद्धा आता तिच्या पावलावर पाऊल टाकले आहे. काही दिवसांपूर्वीच पलकने एक फोटोशूट केले असून त्यातील काही फोटोज इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये पलक खूपच सुंदर दिसत असून, तिचा लूक बघण्यासारखा आहे. वेगवेगळ्या अ‍ॅँगलने केलेल्या या फोटोशूटमध्ये पलकच्या अदा तिची आई श्वेतासारख्याच आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, श्वेताची लाडकी लेक पलकचा ग्लॅमरस लूक...
 
 
बातम्या आणखी आहेत...