आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet TV Actress Shweta Tiwari\'s Daughter Palak Tiwari

श्रीदेवीच्या मुलींप्रमाणेच ग्लॅमरस आहे श्वेता तिवारीची मुलगी, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलगी पलकसोबत अभिनेत्री श्वेता तिवारी)

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असतात. दोघीही नित्यनेमाने आपली छायाचित्रे ट्विटर आणि फेसबुक या सोशल मीडियावर शेअर करतात. श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचीही चर्चा आहे. तर धाकटी मुलगी खुशीचाही मेकओव्हर झाला असून ती पूर्वीपेक्षा खूप ग्लॅमरस दिसते.
तसे पाहता केवळ बॉलिवूड अभिनेत्रीच्याच मुली ग्लॅमरस असतात, असे नाही. टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिची एकुलती एक मुलगीसुद्धा याचे उदाहरण आहे. श्वेताच्या मुलीचे नाव पलक तिवारी आहे.
वॉशिंग्टन डीसीच्या वर्ल्ड वॉर 2 मेमोरियल येथे क्लिक झालेली पलकची छायाचित्रे सध्या सोशल साइट्सवर बघायला मिळत आहेत. पलक आपल्या आईसोबत पोज देताना दिसतेय. ती अगदी हुबेहुब आपल्या आईप्रमाणेच दिसते. बिग बॉस सिझन 4 ची विजेती असलेल्या श्वेताने दोन वर्षांपूर्वीच अभिनेता अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले आहे.
पलक ही श्वेता आणि तिचा पहिला नवरा राजा चौधरीची मुलगी आहे. राजा चौधरीच्या मारहाणीला आणि शिवीगाळला कंटाळून श्वेताने त्याच्यापासून घटस्फोट घेतला. विशेष म्हणजे राजासोबतचे श्वेताचा लव्ह मॅरेज होते. घटस्फोटानंतर मुलगी पलकची कस्टडी श्वेताला मिळाली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, श्वेताची लाडकी लेक पलक तिवारीची खास छायाचित्रे...