मुंबई- कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाइट्स...' या कॉमेडी शोचा लास्ट एपिसोड 17 जानेवारीला प्रसारित केले जाणार आहे. या शोमधील सर्व पात्रांना कपिलच्या खिल्लीचा शिकार व्हावे लागते. परंतु सर्वात जास्त खिल्ली उडवली जाते, मंजू शर्माची म्हणजेच सुमोना चक्रवर्तीची. ती या शोमध्ये 'कपिलच्या पत्नी'च्या भूमिकेत आहे. कपिल नेहमी तिला मोठ्या ओठांची म्हणून चिडवत असतो.
सुरुवातीपासूनच कपिलच्या शोशी जोडलेली आहे सुमोना...
सुमोना कपिलच्या शोमध्ये पहिल्या दिवशीपासून काम करतेय. तिच्या आणि कपिलच्या ट्यूनिंगने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन होते. शोदरम्यान नेहमी कपिलच्या खिल्लीची शिकार होणारी सुमोना खासगी आयुष्यात बिनधास्त आहे. ती फ्रेंड्ससोबत पार्टी आणि आऊटिंग करताना दिसते.
उत्तर प्रदेशमधून सुमोना घेतले शिक्षण...
मुंबईमध्ये राहणा-या सुमोनाने लोरेटो कॉन्वेंट स्कूल लखनऊ, उत्तर प्रदेश आणि हीरानंदानी फाऊंडेशन स्कूल, मुंबईमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. तिने मुंबईच्या हिंद कॉलेजमधून पदवी शिक्षण घेतले. तिच्या कुटुंबात वडील, आईशिवाय एक धाकटा भाई आहे. वडील श्रीलंकेत कार्यरत आहे. 1997मध्ये त्यांचे कुटुंबीय मुंबईला स्थायिक झाले.
आमिर खानसोबत केले आहे काम
कदाचितच कुणाला माहित असेल, की सुमोना चक्रवर्तीने बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच आमिर खानसोबतसुध्दा काम केले आहे. तिने 1999मध्ये आलेल्या अनिल कपूर आणि मनीषा कोयराला स्टारर 'मन' सिनेमात एक बालकलाकार म्हणून काम केले आहे. त्यावेळी ती केवळ 12 वर्षांची होती आणि सहाव्या वर्गात शिकत होती.
अनेक मालिकांमध्ये केले आहे काम
सध्या 'कॉमेडी नाइट्स...'मध्ये कपिलच्या ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारणा-या सुमोनाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. दूरदर्शनच्या 'कब क्यों कैसे' (2009), झी टीव्हीच्या 'कसम से' (2006-2009), बिनधास्त चॅनलच्या 'सुन यार चिल मार' (2007), स्टार प्लस चॅनलच्या 'कस्तूरी'(2007-2009), आणि सोनी एन्टरटेन्मेन्ट चॅनलवरील 'बडे अच्छे लगते है' (2011)सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने दमदार अभिनय करून आपली ओळख निर्माण केली आहे. सुमोना अभिनयासोबतच मॉडेलिंगसाठीसुध्दा ओळखली जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कपिलच्या ऑनस्क्रिन पत्नीची खासगी आयुष्यातील काही खास छायाचित्रे... ही छायाचित्रे सुमोनाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत. (काही छायाचित्रांमध्ये सुमोना आपल्या फ्रेंड्ससोबत दिसत आहे.)