आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Sumona Chakravarti The Reel Life Wife Of Comedian Kapil Sharma

ही आहे कपिल शर्माची ऑनस्क्रिन पत्नी, REAL लाइफ असे करते एन्जॉय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : सुमोना चक्रवर्ती, उजवीकडे (खाली) अॅक्ट्रेस उर्वशी ढोलकियासोबत सुमोना - Divya Marathi
फाइल फोटो : सुमोना चक्रवर्ती, उजवीकडे (खाली) अॅक्ट्रेस उर्वशी ढोलकियासोबत सुमोना
मुंबईः 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी शोमुळे यशोशिखरावर पोहोचलेला विनोदवीर कपिल शर्माचा 'किस किसको प्यार करुं' हा पहिला बॉलिवूड सिनेमा उद्या बॉक्स ऑफिसवर झळकणारेय. दिग्दर्शक अब्बास-मस्तानच्या या सिनेमात कपिलने एकदा दोनदा नव्हे तर तब्बल तीनदा लग्न केले आहे. इतकेच नाही तर त्याची एक गर्लफ्रेंडसुद्धा आहे.

तसे पाहता, कपिलने यापूर्वीही विवाहीत पुरुषाची भूमिका साकारली आहे. त्याच्या गाजत असलेल्या कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोमध्ये त्याने विवाहित बिट्टूची भूमिका साकारली आहे. शोमध्ये त्याच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती साकारत आहे. शोमध्ये बिट्टू आणि मंजू यांच्यात होणारी नोकझोंक प्रेक्षकांचे भूरपूर मनोरंजन करत आहे.
सुमोना चक्रवर्ती पहिल्या दिवसापासून या शोसोबत जुळली आहे. तिची आणि कपिलची ट्युनिंग प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. शोमध्ये अगदी साधीभोळी दिसणारी सुमोना खासगी आयुष्यात मात्र बिनधास्त आहे. मित्रमैत्रिणींसोबत पार्टी आणि आउटिंग करणे तिला पसंत आहे. जाणून घेऊयात सुमोनाविषयी...
उत्तरप्रदेशमध्ये झाले आहे सुमोनाचे शिक्षण
मुंबईमध्ये राहणा-या सुमोनाने लखनऊच्या लोरेटो कान्वेंट स्कुल आणि मुंबईतील हीरानंदानी फाउंडेशन स्कुल, येथून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. मुंबईच्या जय हिंद कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या सुमोनाच्या कुटुंबात आई-वडिलांव्यतिरिक्त एक धाकटा भाऊसुध्दा आहे. तिचे वडील श्रीलंकेमध्ये कार्यरत आहेत. 1997पासून तिचे कुटुंबीय मुंबईमध्ये वास्तव्याला आहे.
आमिर खानसोबत केले आहे काम
कदाचितच कुणाला माहित असेल, की सुमोना चक्रवर्तीने बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच आमिर खानसोबतसुध्दा काम केले आहे. तिने 1999मध्ये आलेल्या अनिल कपूर आणि मनीषा कोयराला स्टारर 'मन' सिनेमात एक बालकलाकार म्हणून काम केले आहे. त्यावेळी ती केवळ 12 वर्षांची होती आणि सहाव्या वर्गात शिकत होती.
अनेक मालिकांमध्ये केले आहे काम
सध्या 'कॉमेडी नाइट्स...'मध्ये कपिलच्या ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारणा-या सुमोनाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. दूरदर्शनच्या 'कब क्यों कैसे' (2009), झी टीव्हीच्या 'कसम से' (2006-2009), बिनधास्त चॅनलच्या 'सुन यार चिल मार' (2007), स्टार प्लस चॅनलच्या 'कस्तूरी'(2007-2009), आणि सोनी एन्टरटेन्मेन्ट चॅनलवरील 'बडे अच्छे लगते है' (2011)सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने दमदार अभिनय करून आपली ओळख निर्माण केली आहे. सुमोना अभिनयासोबतच मॉडेलिंगसाठीसुध्दा ओळखली जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कपिलच्या ऑनस्क्रिन पत्नीची खासगी आयुष्यातील काही खास छायाचित्रे... ही छायाचित्रे सुमोनाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत. (काही छायाचित्रांमध्ये सुमोना आपल्या फ्रेंड्ससोबत दिसत आहे.)