टीव्ही इंडस्ट्रीत सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. अलीकडेच टीव्ही इंडस्ट्रीतील दोन प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकल्या. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम दिशा वाकानी आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील पूजा जोशी यांचे अलीकडेच लग्न झाले. दिशाचे लग्न गुजराती पद्धतीने झाले. मुंबईतील उद्योगपती मयूर परीहासोबत दिशा विवाहबद्ध झाली. तर दुसरीकडे अभिनेत्री पूजा जोशी अकोल्याचे उद्योगपती मनीषसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. मुंबईत हे लग्न झाले. आपल्या लग्नात या दोन्ही अभिनेत्री अतिशय सुंदर दिसल्या. या खास दिवशी दोघींचेही सौंदर्य अधिकच खुलून आले होते. अगदी धुमधडाक्यात त्यांचे लग्न झाले.
स्मॉल इंडस्ट्रीतील अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींचे अलीकडच्या काळात लग्न झाले आहे. आयुष्यातील हा क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी या अभिनेत्रींनी कोणतीही कसर शिल्लक ठेवली नव्हती. अगदी धुमधडाक्यात या अभिनेत्री आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत विवाहबद्ध झाल्या.
या खास दिवशी कसा होता या अभिनेत्रींचा लूक, हे आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, लग्नाच्या दिवशी कसा होता अभिनेत्रींचा लूक...