मुंबईः स्मॉल स्क्रिनवरील बहुचर्चित '
बिग बॉस 8' हे पर्व सुरु झाले आहे. यंदाचे 'बिग बॉस'चे घर विमानासारखे डिझाइन करण्यात आले आहे. प्रत्येक पर्वात 'बिग बॉस'च्या घरात बदल करण्यात येतो. त्यामुळे या पर्वातसुद्धा घर हटके पद्धतीचे दिसत आहे. जेव्हा 'बिग बॉस'चे शूटिंग सुरु असते, त्याकाळात शोचा होस्ट सुपरस्टार
सलमान खानसाठीसुद्धा एका स्पेशल घराची सोय करण्यात येते. लोणावळ्यात 'बिग बॉस'चा सेट उभारण्यात आला आहे. येथेच
सलमान खानसाठीसुद्धा स्पेशल कॉटेज तयार करण्यात आले आहे. शुभज्योती दत्ता गेल्या चार वर्षांपासून सलमानसाठी कॉटेज डिझाइन करत आहेत. त्यांनी सांगितले, "जेव्हा
सलमान खान येतो, तेव्हा त्याला सर्वकाही परफेक्ट हवे असते. त्यामुळे तुम्ही चुक करण्याचा चान्स घेऊ शकत नाहीत."
मिस्टर दत्ता नौशान मेननसोबत तीन डिमेन्शन कंपन्यांचे मालक आहेत. बिग बॉसच्या मागील चार पर्वांपासून त्यांच्यावर लोणावळ्यात सलमानसाठी स्पेशल कॉटेज तयार करण्याची जबाबदारी आहे. दरवर्षी ते कॉटेज अशापद्धतीने डिझाइन करतात, जे गेल्यावर्षीच्या तुलनेत अगदी वेगळे असते. त्यांनी सांगितले, "मी सलमानचे सिनेमे बघून लहानाचा मोठा झालो आहे. तो माझा आदर्श आहे. माझ्या आणि नौशादसाठी सलमानचे कॉटेज डिझाइन करणे ही एक मोठी संधी आहे. गेल्या चार वर्षांपासून आमची कंपनी त्याचे कॉजेट डिझाइन करत आहे."
दरवेळी काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न...
सलमानला आनंदी ठेवणे किती कठीण आहे, असे दत्ता यांना विचारल्यावर ते म्हणाले, "आम्ही सलमानची रुम डिझाइन करतो. साहजिकच हे काम सोपे नाहीये. असे काहीही नाही जे या अभिनेत्याने बघितले नसावे. त्याच्यासाठी नेहमी काहीतरी वेगळे नवीन करण्याचा आमचा प्रयत्न असतो."
सलमानच्या आवडीकडे विशेष लक्ष...
त्यांनी पुढे सांगितले, "सलमानचे आवडते रंग, आवडते पेट आणि फिटनेससाठी जिम याकडे आमचे विशेष लक्ष असते. याशिवाय लिव्हिंग रुम, मोठे गार्डन यावरही काम करावे लागते. आम्ही अडीच ते तीन हजार चौ. फुटावर काम करतो. भिंतींवर काळ्या आणि पांढ-या रंगाच्या कॉम्बिनेशनचा वापर करण्यात आला आहे. त्याला कुत्रे पसंत आहेत. त्यामुळे एक मोठी डॉग रुमसुद्धा तयार करण्यात आली आहे। तो
आपला जास्तीत जास्त वेळ बागेत घालवतो. एकंदरीतच सर्वकाही सलमानच्या आवडीनुसार तयार करण्यात आले आहे."
दत्ता यांनी सांगितले, "आम्हाला तयारीसाठी 15 ते 20 दिवसांचा अवधी लागतो. यासाठी 30 ते 40 लोकांची टीम काम करते. आम्ही यावर्षीसुद्धा एवढ्याच दिवसांत काम पूर्ण केले. सलमाननेसुद्धा आमच्या कामाची प्रशंसा केली आहे."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सलमानच्या लोणावळास्थित शुभज्योती दत्ता यांनी डिझाइन केलेल्या कॉटेजची खास छायाचित्रे...