आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet The Real Family Of Daya Bhabhi Aka Disha Vakani

हे आहेत 'दयाबेन'चे रिअल भाऊ-वहिणी, पाहा इतर कुटुंबीयांचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : दिशा वाकाणी, तिची वहीणी हेमाली आणि भाऊ मयूर
मुंबई- टीव्हीची दयाबेन अर्थातच अभिनेत्री दिशा वाकाणी रिअल लाइफमध्ये वधू बनणार आहे. बातमी आहे, की ती याच महिन्याच्या शेवटी 26 नोव्हेंबरला मुंबई बेस्ड बिझनेसमनशी लग्न करणार आहे. 17 सप्टेंबर 1978ला अहमदाबाद, गुजरातमध्ये जन्मलेली दिशा भावनगरमध्ये लहानची मोठी झाली. शालेय शिक्षण घेत असतानाच तिने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले.
दिशा वाकाणीला खरी ओळख 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून मिळाली. परंतु ती यापूर्वी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये दिसली. या मालिकांमध्ये ‘देराणी-जेठानी’, ‘चाल चंदू परणी जोइए’, ‘लाली-लीला’, ‘अषाढ का एक दिन’, ‘बा रिटायर’, ‘खरा छो तमे’, ‘अलग छता लगोलग’ आणि ‘सो दाहडा सासू’ या मालिका सामील आहेत. हिंदा मालिकांविषयी बोलायचे झाले तर 'तारक मेहता...'शिवाय 'खिचडी' (2004), 'इंस्टेंट खिचडी' (2005)मध्येसुध्दा दिसली आहे. मात्र या दोन्ही शोमध्ये ती पाहूण्याच्या भूमिकेत होती. दिशाने आता 10पेक्षा जास्त टेली अवॉर्ड्स जिंकले आहेत.
भाऊ-बहीण आणि वडिलसुध्दा अभिनय जगात सक्रिय-
दिशाचे वडील भीम वाकाणीसुध्दा आपल्या काळात अभिनयात सक्रिय होते. आता ते काही गुजराती मालिका आणि सिनेमांत काम करतात. आता ते अहमदाबादमध्ये 'वाकाणी थिएटर्स'च्या बॅनरखाली गुजराती नाटकांची निर्मिती करतात. भीम वाकाणी यांनी तयार केलेल्या अनेक मालिकांमध्ये दिशाचा भाऊ मयूर आणि मोठी बहीण खुशालीने काम केले आहे. दिशाचा भाऊ मयूरनेसुध्दा स्कल्पचरचा कोर्स केले आहे आणि त्याचे नाव गुजरातच्या प्रसिध्द शिल्पकारांमध्ये सामील आहे. शिवाय त्याला अभिनयाचासुध्दा शौक आहे. तो अनेक गुजराती मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसला आहे. तसेच दिशाची थोरली बहीण खुशाली सध्या गुजराती थिएटर्सचा प्रसिध्द चेहरा आहे. दिशाचा भाऊ मयूर वाकाणीचे लग्न झाले आहे आणि त्याला दोन मुलेसुध्दा आहे. मयूच्या पत्नीचे नाव हेमाली आहे. मयूर 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दया भाभीचा (दिशा वाकाणी) भाऊ सुंदरलालचे पात्र साकारत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दया अर्थातच दिशा वाकाणीच्या कुटुंबीयांचे फोटो...