आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See Real Life Photos Of Anita Bhabhi Aka Saumya Tandon

शाहरुख, करीनासोबत केलंय काम, आता अनिता भाभी बनून करतेय एन्टरटेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : सौम्या टंडन, उजवीकडे भाभीजी घर पर हैच्या पोस्टरवर)
छोट्या-छोट्या गोष्टींवर नाराज होणे आणि मजाकमध्ये पत्नींविषयी वाईट ऐकून न घेणे, असा आहे अनिता भाभीचा अंदाज. आम्ही बोलतोय अँड टीव्हीच्या लोकप्रिय शो 'भाभीजी घर पर है'मधील अनिता नारायण मिश्राविषयी. या भूमिकेला टीव्ही होस्ट, बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सौम्या टंडन साकारत आहे. क्वचितच लोकांना ठाऊक असेल, की सौम्याचा जन्म 3 नोव्हेंबर 1984मध्ये भोपाळ येथे झाला. मात्र ती बालपणापासून कुटुंबीयांसोबत उज्जैनमध्ये
शिफ्ट झाली आहे.
उज्जैनच्या सेंट मेरी, कॉन्वेंट स्कूलमधून तिने शिक्षण पूर्ण केले. ती कवीयत्रीसुध्दा आहे आणि 'मेरी भावना' नावाचे एक पुस्तकसुध्दा प्रकाशित केले आहे. वयाच्या 6व्या वर्षीपासूनच तिने लिखानास सुरुवात केली होती आणि तिचे वडील बी टंडन तिच्यासाठी प्रेरणा होते. सौम्याचे वडील बी टंडन विक्रम यूनिव्हर्सिटी उज्जैनमध्ये इंग्लिश डिपार्टमेंटचे विभाग आधिकारी होते. ते शेक्सपिअर लिटरेचरचे एक्सपर्टसुध्दा होते. इंग्लिश लिटरेचरच्या विविध शाखांवर त्यांनी जवळपास 17 पुस्तके लिहिली आहेत.
2006मध्ये केला पहिला टीव्ही शो-
सौम्याने पहिला टीव्ही शो 2006मध्ये केला. या शोचे नाव 'ऐसा देश है मेरा' होते आणि त्यामध्ये सौम्या रस्टि देओलच्या भूमिकेत होती. त्यानंतर ती 'मेरी आवाज को मिल गई रोशनी'मध्ये अभिनय करताना दिसली. होस्ट म्हणून ती शाहरुख खानसोबत 'जोर का झटका' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. शिवाय 'कॉमेडी सर्कस के तानसेन', 'मल्लिका-ए-किचन ऑन एअर' (2,3,4) 'डान्स इंडिया डान्स' (1, 2, 3)सारखे शोसुध्दा तिने केले आहेत.
'जब वी मेट'मध्ये बनली करीनाची बहीण-
2007मध्ये सौम्याने दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या 'जब वी मेट'मधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या सिनेमात तिने गीत (करीना कपूर)च्या बहिणीच्या रुपात दिसली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनिता भाभीचे काही रिअल लाइफ फोटो...