आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Wife Of Ashish Sharma Aka Ram Of Siya Ke Ram

ही आहे 'राम'ची Real Life 'सिता', दोनदा अडकले लग्नाच्या बेडीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'सिया के राम' या मालिकेत अभिनेता आशिष शर्मा, राम ही व्यक्तिरेखा साकारत आहे. मालिकेत सध्या राम-सीता आणि लक्ष्मण वनवासात असल्याचा ट्रॅक सुरु आहे. या मालिकेत अभिनेत्री मदिराक्षी मुंडले सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. आज या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला राम अर्थातच आशिष शर्माच्या रिअल लाईफ सीतेविषयी अर्थातच त्याच्या पत्नीविषयी सांगणार आहोत. आशिषच्या रिअल लाईफ पार्टनरचे नाव आहे अर्चना तायडे. वडोदरा येथे सागर स्टुडिओत दोघांची पहिली भेट झाली होती. विशेष म्हणजे अर्चनासुद्धा टीव्ही अभिनेत्री आहे.
कोण आहे आशिष शर्मा?
30 ऑगस्ट 1984 रोजी जयपूरमध्ये जन्मलेल्या आशिषने इंडिया इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण तर नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशनमधून फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी प्राप्त केली. शालेय जीवनापासूनच आशिष नाटकांमध्ये अभिनय करत आला आहे. शाळेच्या कल्चरल प्रोग्राममध्ये तो आवर्जुन सहभाग घेत असे. त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात तो विजय माथूर यांच्या नाट्य संस्थेशी जुळला. २०१४ मध्ये आशिषने 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोचे विजेतेपद आपल्या नावी केले होते.
'लव्ह सेक्स और धोखा' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री
दिबाकर बॅनर्जींच्या 'लव्ह सेक्स और धोखा' या सिनेमातून आशिषने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१० मध्ये त्याचा हा सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर आशिष मोठ्या पडद्याकडून छोट्या पडद्याकडे वळला. 'गुन्हाओं के देवता' या मालिकेत तो लीड रोलमध्ये झळकला. याशिवाय 'चंद्रगुप्त मौर्य', 'रब से सोना इश्क', 'रंगरसिया', 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' या मालिकांमध्ये
त्याने काम केले. आशिष लेखक असून त्याने अनेक कविता लिहिल्या आहेत.
कोण आहे अर्चना तायडे ?
अर्चना तायडे ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ७ नोव्हेंबर १९८८ रोजी हैदराबाद येथे एका ख्रिश्चन कुटुंबात अर्चनाचा जन्म झाला. 'बॉलिवूड का टिकिट' या शोद्वारे तिने टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर ती 'कुबुल है' या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. सध्या अर्चना देसी फिल्म्स नावाच्या कंपनीत क्रिएटीव्ह हेड म्हणून काम करत आहे.
कशी झाली अर्चना आणि आशिषची भेट आणि लग्न...
आशिष आणि अर्चनाची भेट २०११ मध्ये वडोदराच्या सागर स्टुडिओत झाली होती. येथे आशिष 'चंद्रगुप्त मौर्य' या मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी होता. तर अर्चना 'शनीदेव' या मालिकेचे शूटिंग करत होती. दोघांचा कॉमन फ्रेंड डायरेक्टर गौतम नागरथे यांनी आशिष आणि अर्चना भेट घालून दिली होती. विशेष म्हणजे दोघांचेही लव्ह अॅट फस्ट साइट होते. दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर ३० जानेवारी २०१३ रोजी जयपूरमध्ये आशिष आणि अर्चना लग्नाच्या बेडीत अडकले. आशिष-अर्चनाचे दोन पद्धतीने लग्न लागले. पहिले लग्न हिंदू पद्धतीनुसार तर दुसरे लग्न ख्रिश्चन पद्धतीने झाले.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, छोट्या पडद्यावरच्या रामची खासगी आयुष्यातील पत्नीसोबतची खास छायाचित्रे...