आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाच्या बेडीत अडकली ही प्रसिद्ध अॅक्ट्रेस, सोनाक्षी सिन्हाच्या एक्स बॉयफ्रेंडची होती पहिली पत्नी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री आणि मॉडेल मेघना गुप्ताने 'एक था राजा एक थी रानी' या मालिकेत राणा इंद्रवर्धन सिंह देव (राणाजी) ही भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धांत कर्णिकसोबत लग्न केले आहेत. मेघनाचे हे दुसरे लग्न आहे. यावर्षी मे महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. खरं तर मेघना आणि सिद्धांतचे येत्या सप्टेंबर महिन्यात लग्न होणार होते. मात्र काही कारणास्तव या जोडप्याने 16 ऑगस्ट रोजी रजिस्टर्ड मॅरेज केले.

का नाही केले धुमधडाक्यात लग्न...
महिन्याभरापूर्वी मेघनाच्या वडिलांचे निधन झाले आहे. याच कारणामुळे त्यांनी धुमधडाक्यात लग्न न करण्याचा निर्णय घेतला. याविषयी सिद्धांत सांगतो, "होय आम्ही रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केले. कारण मेघनाच्या वडिलांच्या अकाली निधनामुळे आम्ही लग्न अगदी साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. सेलिब्रेशन कधीही करता येईल."

मेघनाचे दुसरे तर सिद्धांतचे हे पहिले लग्न...
मेघनाचे पहिले लग्न आदित्य श्रॉफसोबत झाले होते. आदित्य श्रॉफ बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा एक्स बॉयफ्रेंड आहे. मेघनासोबत लग्न होण्यापूर्वी आदित्य सोनाक्षीला डेट करत होता. 2014 मध्ये मेघना आणि आदित्यचा घटस्फोट झाला. नमन शॉसोबतही मेघनाचे अफेअर होते. मेघनाच्या प्रोफेशनल लाइफविषयी बोलायचे झाल्यास, तिने 'काव्यांजली', 'कुमकुम', 'कुसुम', 'सीआयडी', 'मैं तेरी परछाई हूं', 'यहाँ मैं घर घर खेली' आणि 'ड्रीम गर्ल' या मालिकांमध्ये काम केले आहे.

तर सिद्धांत शेवटचा 'एक था राजा एक थी रानी' या मालिकेत दिसला होता. यापूर्वी तो 'रीमिक्स', 'माही वे', 'रिश्ता डॉट कॉम', 'प्यार की यह एक कहानी', 'ये है आशिकी' आणि 'गुस्ताख दिल' या मालिकांमध्ये झळकला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, मेघना-सिद्धांतची काही छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...