आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चिडियाघर' फेम या बालकलाकाराची प्रकृती गंभीर, अपघातानंतर झाले ब्रेन हॅमरेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः मनीष विश्वकर्मा)
मुंबईः 'चिडियाघर' या विनोदी मालिकेत मेंढक प्रसाद ही व्यक्तिरेखा साकारणारा बालकलाकार मनीष विश्वकर्मा याची प्रकृती गंभीर आहे. त्याला 48 तास डॉक्टरांच्या देखरेखमध्ये ठेवण्यात आले आहे. शनिवारी शूटिंगस्थळी पोहोचताना गोरेगाव येथील आरे. कॉलनीमध्ये त्याच्या बाइकला अपघात झाला होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनीषला मुंबईतील केईएम या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झालेली नाही. 48 तास त्याला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. त्याला ब्रेन हॅमरेज झाले असून मेंदूतून रक्तस्त्राव होतोय.
Divyamarathi.com मनीष लवकरात लवकर बरा व्हावा, ही प्रार्थना करत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'चिडियाघर'मधील मनीषच्या फनी अंदाजाची निवडक छायाचित्रे...