आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'मेरी आशिकी...\'ची अॅक्ट्रेस चढली बोहल्यावर, एकत्र काम करत असताना को-स्टारसोबत जुळले सूत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'मेरी आशिकी तुमसे ही' या मालिकेतील कपल स्मृती खन्ना आणि गौतम गुप्ता ख-या आयुष्यात साता जन्माचे जोडीदार बनले आहेत.  23 नोव्हेंबर रोजी हे जोडपं विवाहबंधनात अडकलं. या दोघांच्या लग्नाचे फोटोज समोर आले आहेत. यामध्ये स्मृती पिंक अँड सिल्व्हर कलरच्या लहेंग्यात अतिशय सुंदर दिसतेय. तर गौतमने लग्नासाठी क्रीम अँड व्हाइट कलरच्या शेरवानीची निवड केली. या दोघांच्या लग्नाला बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेता करणवीर बोहरा पत्नी टीजे सिंधूसोबत नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जुन उपस्थि होता. याशिवाय अभिनेत्री दिया मिर्झा, जॅकी भगनानी, सुझान खानसह अनेक सेलेब्स या लग्नात सहभागी झाले होते. 


बुधवारी झाला मेंदी आणि हळदीचा कार्यक्रम...
- बुधवारी स्मृतीच्या मुंबईतील राहत्या घरी हळदी आणि मेंदी सेरेमनी पार पडली. 
- हळदी सेरेमनीत स्मृतीने यलो अँड पिंक कलरचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. तर मेंदी सेरेमनीत तिने यलो शेड असलेला लहेंग्याची निवड केली होती.


मे 2017 मध्ये झाला होता साखरपुडा...

- स्मृती आणि गौतम यांची पहिली भेट  'मेरी आशिकी तुमसे ही' (2014-16) या मालिकेच्या सेटवर झाली होती.
- रील लाइफमध्ये कपलची भूमिका साकारत असताना हे दोघे ख-या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले.
- वर्षभर डेटिंग केल्यानंतर या दोघांनी 2017 मध्ये आपल्या नात्याची कबुली दिली आणि मे 2017 मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, स्मृती खन्ना आणि गौरव गुप्ता यांच्या मेंदी, हळदी आणि लग्नाचे खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...