(इंडियाज रॉ स्टारच्या सेटवर हनी सिंग आणि मीका)
मुंबई: बॉलिवूड गायक मीका सिंह 'बलविंदर सिंह फेमस हो गया' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी हनी सिंहच्या 'इंडियाज रॉ स्टार' या शोमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याने स्पर्धकांसह परफॉर्मसुध्दा केले. मीका सिंह आणि शान अभिनीत 'बलविंदर सिंह फेमस हो गया' हा सिनेमा 26 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. सध्या शान आणि मीका दोघेही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अलीकडेच, '
कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी शोमध्ये गेले होते.
हनी सिंगच्या 'इंडियाज रॉ स्टार' या शोमध्ये मीकाने एकट्याने सिनेमा प्रमोट केला. यावेळी मीका आणि हनी सिंगने स्पर्धकांसह परफॉर्मन्सुध्दा दिला. सिनेमात राजपाल यादव आणि अनुपम खेर यांच्याही भूमिका आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शोधील छायाचित्रे...